किंग कोहलीची वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

विराट कोहलीने आयपीएलमध्ये आणखी एक टप्पा गाठला आहे. कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये ५०० धावांचा टप्पा पार केला.

या कामगिरीसह विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

यासह विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये आतापर्यंत सात वेळा ५००+ धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहलीचा समावेश झाला आहे.

विराट कोहलीने २०११, २०१३, २०१५, २०१६, २०१८,२०२३ आणि २०२४ या वर्षात खेळलेल्या आयपीएल स्पर्धेत ५०० हून धावा केल्या आहेत.

आहारात नारळ घेण्याचे फायदे

pixabay