मराठी बातम्या  /  धर्म  /  Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

Apr 28, 2024, 06:42 PM IST

    • shani jayanti 2024 date : शनि जयंतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. ते सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचे स्वामी मानले जातात.
Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

shani jayanti 2024 date : शनि जयंतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. ते सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचे स्वामी मानले जातात.

    • shani jayanti 2024 date : शनि जयंतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. ते सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचे स्वामी मानले जातात.

shani jayanti significance : सनातन धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात अशी मान्यता आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजी राजेंबाबत या खास गोष्टी सर्वांना माहीत असायलाच हव्यात!

Ganga Saptami : गंगा सप्तमी कधी आहे? जाणून घ्या गंगा पूजनाचे महत्व आणि पूजा पद्धत

Astro Upay : पायात काळा धागा का बांधतात, याचा फायदा काय? जाणून घ्या

एका दिवसात किती भाविक चारधामचे दर्शन घेऊ शकतील? सध्या सर्व धामांचे हवामान कसे आहे? जाणून घ्या

शनिवार आणि शनि जयंती ही भगवान शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. यावेळी शनि जयंती बुधवारी, ८ मे २०२४ रोजी साजरी केली जाईल. 

दरम्यान, अशीही मान्यता आहे, की या दिवशी रविपुत्राची पूर्ण भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना इच्छित वरदान मिळते, तर चला जाणून घेऊया या दिवसाशी संबंधित काही खास गोष्टी.

शनि जयंतीचे धार्मिक महत्व

हिंदूंमध्ये शनि जयंतीला खूप महत्त्व आहे. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. ते सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचे स्वामी मानले जातात. तसेच, असे म्हणतात की, शनिदेवाची वक्रदृष्टी जिकडे पडते, तिकडे गडबड गोंधळ सूरू होतो.

एकदा रावणाने शनिदेवाला कैद केले होते, त्यानंतर हनुमानजींनी त्यांना तेथून मुक्त केले होते. तेव्हा शनिदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की, जे भक्त पूर्ण भक्तीभावाने बजरंगबलीची पूजा करतात त्यांच्यावर शनिदोष कधीच होणार नाही. तसेच त्यांचा आशीर्वाद त्या लोकांवर सदैव राहील".

शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा

सकाळी उठून पवित्र स्नान करावे.

शनि मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

शनिदेवाच्या वैदिक मंत्रांचा १०८ वेळा जप करा.

गरजूंना अन्न आणि कपडे दान करा.

तामसिक गोष्टींचे सेवन करू नये.

कोणाशीही वाद घालू नका.

महिलांचा अपमान करू नका.

शक्य तितके धार्मिक कार्य करा.

कोणाबद्दल वाईट बोलू नका.

 

शनि वैदिक मंत्र

ओम शन्नोदेववीर-भिष्टय्यापो भवन्तु पीतये शन्योर्भिस्त्रवंतुनः।

शनी गायत्री मंत्र

ओम भगवय विद्महेन मृत्युरूपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यत् ।

शनि महामंत्र

ओम नीलांजन समभस्म रविपुत्रम् यमग्रजम्। छायामार्तंड सम्भूतं तन् नमामि शनैश्चरम् ।

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या