मराठी बातम्या  /  धर्म  /  Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 26, 2024 08:21 PM IST

May Month Pradosh Vrat 2024 : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. मे महिन्यातील पहिला प्रदोष व्रत ५ मे रोजी ठेवण्यात येणार आहे.

May Month Pradosh Vrat 2024 मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या
May Month Pradosh Vrat 2024 मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

सनातन धर्मात प्रदोष व्रत अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. प्रदोश वृताच्या दिवशी जे लोक शिव-पार्वतीची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. याशिवाय या तिथीचे व्रत केल्यास अपत्यप्राप्तीदेखील होते.

ट्रेंडिंग न्यूज

मे महिन्याचा पहिला प्रदोष ५ मे २०२४ रोजी ठेवण्यात येणार आहे. रविवारी येणारे प्रदोष व्रत हे रवि प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते, चला तर मग जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

मे २०२४ चे पहिले प्रदोष व्रत कधी?

हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार, ५ मे २०२४ रोजी संध्याकाळी ०५:४१ पासून सुरू होईल. हे सोमवार, ६ मे २०२४ रोजी दुपारी ०२:४० पर्यंत चालेल. हिंदू कॅलेंडर पाहता यावेळी प्रदोष व्रत ५ मे २०२४ रोजी पाळले जाणार आहे. यासोबतच भोलेनाथाचा अभिषेकही याच दिवशी केला जाणार आहे.

प्रदोष व्रत पूजा विधी

भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी भक्ताने पहाटे लवकर उठून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी. वेदीवर शिव परिवाराची मूर्ती स्थापित करा. यानंतर भगवान शिवाला पंचामृताने भक्तिभावाने अभिषेक करावा. भोलेनाथला चंदनाचा टिळक आणि पार्वतीला कुंकुम तिलक लावा.

फळे, खीर, सुका मेवा आणि पांढरी मिठाई अर्पण करा. शिव चालिसा आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण करा. आरती करून पूजा पूर्ण करा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कडक उपवास ठेवा. शिवपूजेत बेलच्या पानांचा अवश्य समावेश करा. पूजेत झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी.

प्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व

प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी कठोर व्रत पाळणारे भक्त सुख-समृद्धी प्राप्त करतात, असे म्हटले जाते. तसेच भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. काही लोक या विशेष दिवशी भगवान शंकराच्या नटराज रूपाची पूजा करतात.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवांचा देव महादेवाने तांडव करून अप्सरा राक्षसाचा पराभव केला होता. भगवान शिवाचे नृत्याविष्ट नटराज नावाने ओळखले जाते, याच्या उपासनेने अक्षय फळ मिळते.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

WhatsApp channel

विभाग