सनातन धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्र कुंडली पाहून व्यक्तीचे भविष्य ठरवते. यावरून त्या व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल की नाही किंवा त्या व्यक्तीला सुख आणि प्रसिद्धी मिळेल की नाही याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
ज्योतिषांच्या मते, कुंडलीत अनेक शुभ योग तयार होत असतात. या योगांचा अर्थ असा होतो की व्यक्तीला आयुष्यभर पैशाची कमतरता भासणार नाही किंवा त्या व्यक्तीला सुख-समृद्धी लाभणार आहे. जर तुमच्या कुंडलीतही हे योग तयार होत असतील तर समजून जा, की एक दिवस तुम्ही नक्कीच धनवान होणार आहात. चला तर मग कुंडलीतील अशा योगांबाबत जाणून घेऊया.
ज्योतिषांच्या मते कुंडलीत महालक्ष्मी योग तयार झाल्यास व्यक्तीला आयुष्यात उच्च स्थान प्राप्त होते. एखाद्या व्यक्तीचा जन्म गरीब कुटुंबात झाला असला तरी तो धनदेवतेच्या कृपेने एक दिवस नक्कीच श्रीमंत होतो.
जर तुमच्या कुंडलीत मालव्य योग तयार झाला असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक दिवस नक्कीच श्रीमंत व्हाल. या योगाचा निर्माता शुक्र हा सुखाचा देव आहे. त्यामुळे या योगात व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.
ज्योतिषांच्या मते फार कमी लोकांच्या कुंडलीत महाभाग्य योग तयार होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत महाभाग्य योग तयार होत असेल तर तो भाग्यवान असतो. या योगामुळे व्यक्तीची सर्व कामे योग्य वेळी होतात. त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता नसते.
ज्योतिषशास्त्रात शंख योग शुभ मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत शंख योग असतो ते भाग्यवान असतात. भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद त्याच्यावर पडतो. त्याच्या कृपेने मनुष्याला नश्वर जगात सर्व प्रकारचे ऐहिक सुख प्राप्त होते. तसेच माणूस श्रीमंत होतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े