हिंदू धर्मात शुभ मुहूर्त पाहूनच कोणतेही शुभ कार्य केले जाते. शुभ मुहूर्तावर केलेल्या कामांमुळे देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे ती कामे नेहमी शुभ फळ देतात. अशा स्थितीत विवाह, नामकरण आणि गृह प्रवेश इत्यादींसाठी मे महिन्यात कोणते शुभ मुहूर्त आहेत, ते जाणून घेऊया.
सर्वार्थ सिद्धी योग हा ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ योग मानला जातो. अशा स्थितीत मे महिन्यात ०५, ०७, ०८, १३, १४, १९, २३, २४ आणि २६ तारखेला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.
अमृत सिद्धी योग हा देखील ज्योतिष शास्त्रात एक शुभ योग मानला जातो. अशा परिस्थितीत ७ आणि १९ मे रोजी अमृत सिद्धी योग तयार होत आहे.
०१, ०३, ०५, ०६, १०, १२, १३, १९, २०, २३, २४, २९ आणि ३० मे दिवस वाहन खरेदीसाठी उत्तम असणार आहेत.
घर खरेदीसाठी - ०३,०४, १२, १३, १७, २२,२३ आणि २४ मे हे दिवस घर खरेदीसाठी शुभ मानले जातात.
विवाह शुभ मुहूर्त - मे महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही.
ग्रह प्रवेशासाठी - मे महिन्यात गृह प्रवेशसासाठी शुभ मुहूर्त नाही.
नामकरणासाठी शुभ मुहूर्त- कॅलेंडरनुसार ०१, ०३, ०५, ०९, १०, १३, १९, २०, २३, २४, २७ आणि ३० मे हे दिवस नामकरणासाठी विधीसाठी शुभ असणार आहेत.
अन्नप्राशनासाठी मुहूर्त - ०३,०९, १०, २०, २३, २७ आणि ३० मे दे दिवस अन्नप्राशन विधीसाठी उत्तम राहतील.
कर्णवेदासाठी शुभ मुहूर्त - ०१, १०, १२, १३, १९, २०, २३,२४,२९ आणि ३० मे हे शुभ आहेत.
अभ्यास सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त - मे महिन्यात अभ्यास सुरू करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही.
उपनयन/जनेयू मुहूर्त - मे महिन्यात ०९, १०, १२, १७, १८, १९, २०, २४ आणि २५ हे दिवस जनेयू संस्कारासाठी शुभ राहतील.
मुंडन मुहूर्त - ०३, १०, २४,२९ आणि ३० मे हे मुंडन संस्कारासाठी उत्तम दिवस असतील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े