मराठी बातम्या  /  धर्म  /  Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Apr 29, 2024, 08:35 PM IST

    • History of Mangalsutra : शास्त्रानुसार मंगळसूत्र हे लग्नाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विवाहानंतर विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. इतिहासकारांच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात सहाव्या शतकात झाली.
History of Mangalsutra सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

History of Mangalsutra : शास्त्रानुसार मंगळसूत्र हे लग्नाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विवाहानंतर विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. इतिहासकारांच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात सहाव्या शतकात झाली.

    • History of Mangalsutra : शास्त्रानुसार मंगळसूत्र हे लग्नाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विवाहानंतर विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. इतिहासकारांच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात सहाव्या शतकात झाली.

सनातन धर्मात मंगळसूत्र घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण आणि लग्नाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात.  सोबतच अशी मान्यता, आहे की मंगळसूत्र घातल्याने वैवाहिक जीवन नेहमी सुरक्षित आणि आनंदी राहते. 

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

पण मंगळसूत्र घालण्याची परंपरा कुठून सुरू झाली याचा विचार तुम्ही केला आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला मंगळसूत्राचा इतिहास आणि त्यापासून मिळणारे फायदे सांगणार आहोत.

मंगळसूत्र घालण्याची परंपरा कधी सुरू झालीे

शास्त्रानुसार मंगळसूत्र हे लग्नाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विवाहानंतर विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. इतिहासकारांच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात सहाव्या शतकात झाली. मोहेंजोदारोच्या उत्खननात मंगळसूत्राचे अवशेष सापडले आहेत. मंगळसूत्र घालण्याची सुरुवात प्रथम दक्षिण भारतात झाली असे म्हणतात. यानंतर बदलत्या काळानुसार भारतासह इतर देशांमध्ये ही परंपरा सुरू झाली.

मंगळसुत्र घालण्याचे फायदे

विवाहित महिलेने मंगळसूत्र घातल्यास तिच्या वैवाहिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात आणि आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर मानले जाते.

मंगळसूत्र धारण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो.

मंगळसूत्र हे ९ मण्यांनी बनवलेले आहे, जे माता राणीच्या ९ रूपांचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव विवाहित महिला मंगळसूत्र धारण करून जीवनात नेहमी उत्साही राहतात. याशिवाय मंगळसुत्र वाईट नजरेपासूनही संरक्षण करते.

मंगळसूत्र धारण केल्याने विवाहित महिलांचे शरीर शुद्ध होते.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या