सनातन धर्मात घरांमध्ये काही झाडे लावणे खपूच शुभ मानले जाते. कारण काही वनस्पतींमध्ये देवांचा वास असतो, अशी मान्यता आहे. या वनस्पतींमध्ये तुळशी, शमीचे झाड इत्यादींचा समावेश आहे. असे मानले जाते, की घरात ही झाडं आणि रोपं घरात लावल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. अशा परिस्थितीत घरात कोणती झाडे लावावीत हे जाणून घेऊया.
सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे. या वनस्पतीमध्ये धनाची देवी लक्ष्मी वास करते. असे मानले जाते की घरात तुळशीचे रोप लावून त्याची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि व्यक्तीला आर्थिक लाभ होतो. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
शमीच्या रोपामध्ये भगवान शिव वास करतात. हे झाड अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की घरात शमीचे रोप लावल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते. तसेच घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. या वनस्पतीची रोज पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील शनीची स्थिती शुभ आणि बलवान बनते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.
सुख-समृद्धी वाढवायची असेल तर घरात मनी प्लांट लावण्याचा सल्ला दिला जातो. पैशाची कमतरता दूर करण्यासाठी, कच्चे दूध पाण्यात मिसळून शुक्रवारी मनी प्लांटला अर्पण करा. हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होतो असे मानले जाते.
याशिवाय तुम्ही घरच्या घरी कोरफडीचे रोप लावू शकता. हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. कोरफड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
संबंधित बातम्या