मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR Vs DC : दिल्लीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

KKR Vs DC : दिल्लीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 29, 2024 07:16 PM IST

KKR Vs DC IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ४७ वा सामना आज दिल्ली आणि कोलकाता यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत.

KKR Vs DC IPL 2024 दिल्लीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
KKR Vs DC IPL 2024 दिल्लीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन (PTI)

आयपीएल २०२४ चा ४७ वा सामना आज (२९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. कोलकातच्या ईडन गर्ड दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात दिल्ली संघ दोन बदलांसह खेळताना दिसणार आहे. पृथ्वी शॉचे पुनरागमन झाले असून, कुमार कुशाग्राच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. तसेच, मुकेश कुमारच्या जागी रसिक दार सलामला संधी देण्यात आली आहे. 

त्याचबरोबर कोलकाता संघात मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा यांचे पुनरागमन झाले आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.

इम्पॅक्ट सब: मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार कुशाग्र.

कोलकाता नाईट रायडर्स:  फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट सब: आंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज.

केकेआर वि. दिल्ली हेड-टू-हेड रेकॉर्ड

केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये एकूण ३२ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये केकेआरने १७ सामने जिंकले आणि दिल्ली कॅपिटल्सने १५ सामने जिंकले. केकेआर आणि दिल्ली यांच्यात झालेल्या शेवटच्या ४ सामन्यांमध्ये दिल्ली संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत.

ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या ९ सामन्यांमध्ये केकेआरने ७ सामने जिंकले, तर दिल्लीने २ सामने जिंकले आहेत.

IPL_Entry_Point