
आयपीएल २०२४ च्या ४६व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपरकिंग्जने हा सामना ७८ धावांनी जिंकला.
(PTI)या विजयासह चेन्नई सुपरकिंग्जने साखळी गुणतालिकेत प्रवेश केला आहे. चेन्नईने सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई ८ सामन्यांतून ८ गुणांसह साखळी तक्त्यात सहाव्या स्थानावर होती. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने नऊ सामन्यांतून १० गुणांसह साखळी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
(PTI)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात आरसीबीने९ गडी राखून विजय मिळवला. मात्र, या सामन्याचा गुणतालिकेवर कोणताही परिणाम झाला नाही. हा सामना जिंकूनही बेंगळुरू संघ गुणतालिकेत तळाशी आहे. गुजरातही सातव्या क्रमांकावर आहे.
(PTI)

