मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Navami 2023 : मार्च महिन्यात कधी आहे रामनवमी?, रामाच्या पूजेनं काय होतं साध्य?

Ram Navami 2023 : मार्च महिन्यात कधी आहे रामनवमी?, रामाच्या पूजेनं काय होतं साध्य?

Mar 08, 2023, 03:19 PM IST

  • Importance Of Ram Navami : पृथ्वीवर असुरांनी माजवलेल्या हाहाकाराला 'संभवामी युगे युगे' असं सांगून गेल्याप्रमाणे भगवंत जेव्हा जेव्हा त्यांची गरज त्यांच्या भक्तांना पडते तेव्हा ते नव्या अवतारात जन्म घेतात आणि मनुष्याचं कल्याण करतात.

भगवान श्रीराम (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Ram Navami : पृथ्वीवर असुरांनी माजवलेल्या हाहाकाराला 'संभवामी युगे युगे' असं सांगून गेल्याप्रमाणे भगवंत जेव्हा जेव्हा त्यांची गरज त्यांच्या भक्तांना पडते तेव्हा ते नव्या अवतारात जन्म घेतात आणि मनुष्याचं कल्याण करतात.

  • Importance Of Ram Navami : पृथ्वीवर असुरांनी माजवलेल्या हाहाकाराला 'संभवामी युगे युगे' असं सांगून गेल्याप्रमाणे भगवंत जेव्हा जेव्हा त्यांची गरज त्यांच्या भक्तांना पडते तेव्हा ते नव्या अवतारात जन्म घेतात आणि मनुष्याचं कल्याण करतात.

श्रीविष्णूचा सातवा अवतार म्हणून भगवान श्रीरामाकडे पाहिलं जातं. पृथ्वीवर असुरांनी माजवलेल्या हाहाकाराला 'संभवामी युगे युगे' असं सांगून गेल्याप्रमाणे भगवंत जेव्हा जेव्हा त्यांची गरज त्यांच्या भक्तांना पडते तेव्हा ते नव्या अवतारात जन्म घेतात आणि मनुष्याचं कल्याण करतात. श्री राम नवमी मार्च २०२३ च्या ३० तारखेला साजरी केली जाईल. भगवान श्रीरामाचा जन्म या तारखेला झाला होता. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी म्हणजेच ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी राम मंदिरात भजन, कीर्तन, गावोगावी मिरवणुका काढल्या जातात. सनातन धर्माच्या लोकांसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

Lucky Plants for Home : कमी दिवसांमध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर ही झाडं तुमच्या घरात नक्कीच लावा, जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

राम नवमी २०२३ चे मुहूर्त

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी - नवमी

तारीख - २९ मार्च २०२३ ते ३० मार्च २०२३

तारीख सुरू - रात्री ०९.०८

तारीख समाप्ती - सकाळी ११.३२

रामनवमी मध्याह्न मुहूर्त - सकाळी ११.१९ ते दुपारी १. ४६

कालावधी - सुमारे ०२ तास २८ मिनिटे

यंदाच्या रामनवमीला काय आहे खास

यंदाच्या रामनवमीला गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी आणि रवि योग या चार शुभ योगांचा संयोग होत आहे. गुरु पुष्य योगामध्ये केलेले प्रत्येक कार्य व्यक्तीला यश मिळवून देते.

राम नवमीला का करावी रामाची पूजा

रामनवमीला रामाची पूजा केल्याने प्रत्येक संकटाचा नाश होतो, असे मानले जाते. साधकाला कीर्ती आणि सौभाग्य मिळते आणि जीवनात सदैव सुख-समृद्धी असते.

रामनवमीला रामचरितमानस किंवा रामायणाचे पठण करणाऱ्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. कुटुंबावर कधीही वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा