मराठी बातम्या  /  धर्म  /  Hanuman Jayanti Wishes: अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा ‘हे’ खास संदेश

Hanuman Jayanti Wishes: अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा ‘हे’ खास संदेश

Apr 23, 2024, 09:53 AM IST

  • Hanuman Jayanti Wishes 2024 In Marathi: हनुमान जयंती म्हणजेच पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान! हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा ‘हे’ खास संदेश

Hanuman Jayanti Wishes 2024 In Marathi: हनुमान जयंती म्हणजेच पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

  • Hanuman Jayanti Wishes 2024 In Marathi: हनुमान जयंती म्हणजेच पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

Hanuman Jayanti Wishes 2024 In Marathi: येत्या २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीरामाचा परमभक्त म्हणून भीमरूपी, बलवान बजरंगबलीची पूजा केली जाते. हनुमान जयंती म्हणजेच पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. भगवान हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनसुत, महावीर, कपिश आणि अंजनेय या नावांनीही संबोधले जाते. हनुमानाची उपासना केल्याने दुःख, रोग, भय, दारिद्र्य, जडत्व आणि मूर्खपणाचा अंत होतो, असे मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी पवनपुत्र मारुती नंदन यांची शुद्ध मनाने पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

बजरंगबलीचे भक्त त्यांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. या दिवशी हनुमान भक्त दिवसभर उपवास ठेवतात आणि संकटमोचन हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करतात. यानिमित्ताने लोक एकमेकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देखील देतात. या शुभ प्रसंगी, जर तुम्हालाही तुमच्या नातेवाईकांना, मित्र आणि प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही हे खास संदेश त्यांना पाठवू शकता.

Hanuman Jayanti 2024 : कर्जापासून मुक्ती मिळेल, कोर्ट-कचेरीची प्रकरणं मिटतील, फक्त हनुमान जयंतीला करा हे सोपे उपाय

मराठीतून द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

> ज्याच्या मनात आहे श्रीराम,

ज्याच्या तनात आहे श्रीराम,

संपूर्ण विश्वात जो आहे बलवान

अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

> रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,

रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी…

हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

> महारुद्र अवतार हा सूर्यवंशी

अनादिनाथ पूर्ण तारावयासी

असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला

नमस्कार माझा तया मारुतीला

हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

शत्रूची करतोस दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..

अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम..

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

 

> अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…

एक मुखाने बोला… जय जय हनुमान…

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

> माझी प्रार्थना आहे की बजरंगबली

आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

> भूत पिशाच निकट नहीं आवे,

महावीर जब नाम सुनावे..

नासे रोग हरे सब पीरा,

जपत निरंतर हनुमत वीरा..

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

> पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो..

हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा