हिंदू धर्मात चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रीरामनवमी आणि नवरात्रोत्सवासोबतच या महिन्यात हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्लपक्षाच्या पौर्णिमेला झाला आहे.
रामभक्त हनुमानजींच्या पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरा केली जाते. या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २३ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाईल. यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिचे महत्त्व आणखी वाढले आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये या दिवसासंदर्भात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने मोठ्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते, चला तर तर मग हनुमान जयंतीला करण्यात येणार उपाय जाणून घेऊया.
हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा केल्याने अनेक चमत्कारिक लाभ होतात. शनिदोष, धैय्या, साधेसती किंवा इतर कोणत्याही अशुभ प्रभावामुळे त्रासलेल्या लोकांनी मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून हनुमान जन्मोत्सवात हनुमानजींसमोर जाळावे. हा उपाय केल्याने शनिदुखापासून आराम मिळतो. तसेच बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो.
हनुमान जयंतीला बजरंगबलीला लाडू, तुळशीची माळ आणि लाल चोळा अर्पण करा. तसेच चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. याशिवाय ७ वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. असे केल्याने कर्ज, पैसा, कोर्ट-कचेरी इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळेल. यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतील.
हनुमान जन्मोत्सवातील पूजेची शुभ वेळ सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते १० वाजून ४१ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी, अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत असेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
संबंधित बातम्या