मराठी बातम्या  /  धर्म  /  Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीच्या दिवशी करा हे ज्योतिषीय उपाय, संपत्ती वाढेल आणि मनोकामना पूर्ण होतील

Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीच्या दिवशी करा हे ज्योतिषीय उपाय, संपत्ती वाढेल आणि मनोकामना पूर्ण होतील

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 18, 2024 09:44 PM IST

Kamada Ekadashi 2024 Upay : कामदा एकादशी यंदा १९ एप्रिल रोजी आहे. या दिवशी काही सोपे उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला या उपायांची माहिती देणार आहोत.

Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीच्या दिवशी करा हे ज्योतिषीय उपाय, संपत्ती वाढेल आणि मनोकामना पूर्ण होतील
Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीच्या दिवशी करा हे ज्योतिषीय उपाय, संपत्ती वाढेल आणि मनोकामना पूर्ण होतील

कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते. यंदा कामदा एकादशीचे व्रत शुक्रवारी १९ एप्रिलला आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

ट्रेंडिंग न्यूज

यासोबतच कामदा एकादशीच्या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांची माहिती देणार आहोत.

१) कामदा एकादशीच्या दिवशी विष्णू चालीसा पाठ करून भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. हे सोपे उपाय तुम्हाला मानसिक स्थिरता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील देतात.

२) तुमचे कोणतेही काम बिघडत असेल, किंवा विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील, तर कामदा एकादशीच्या दिवशी मूठभर अक्षत (अखंड तांदूळ) घेऊन कुमकुममध्ये रंगवा. यानंतर हा तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून विष्णू मंदिरात अर्पण करावा. कामदा एकादशीच्या दिवशी हे उपाय केल्यास तुमचे काम पूर्ण होण्यास मदत मिळेल.

३) यंदा कामदा एकादशीचा दिवशी शुक्रवार आहे. त्यामुळे या दिवशी कनकधार स्तोत्राचे पठण करून आणि भगवान विष्णूची पूजा करून सर्व आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळवता येते. 

असे मानले जाते की कनकधारा स्तोत्राने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर करते. त्यामुळे तुम्हीही कामदा एकादशीच्या दिवशी हे उपाय अवश्य करून पहा.

४) कामदा एकादशीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांना नैवेद्य दाखवून पितृदोषापासून मुक्ती मिळते. यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने तुमचे दु:ख, संकटे दूर होऊ लागतात. जर तुम्ही नद्यांवर जाऊ शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब मिसळा. कामदा एकादशीच्या दिवशीही तुम्ही हे उपाय करून पाहू शकता.

५) आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी आणि नंतर शमीच्या झाडाखाली पिठाचा दिवा लावावा. शमीचे झाड नसेल तर तुळशीच्या रोपासमोर दिवा लावू शकता. 

यानंतर तुमची इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना देवाकडे करा. असे मानले जाते की हा उपाय केवळ तुमच्या मनोकामना पूर्ण करत नाही तर तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी देखील वाढवतो.

६) कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचा सुलभ मंत्र 

'ओम नमो नारायणाय नमः'. 'ओम नमो: भगवते वासुदेवाय नमः' 

हा १००८ वेळा जप केल्याने भगवान विष्णूच्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होतो. या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात संतुलन निर्माण होऊ लागते.

७) कामदा एकादशीच्या दिवशी सात हळदी घेऊन ती पिवळ्या कपड्यात बांधून एक गुंता करून भगवान विष्णूला अर्पण करा. मग ते बंडल कपाट किंवा तिजोरीत पैशांच्या जागी ठेवा. असे केल्याने धनात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कामदा एकादशीच्या दिवशी हे छोटे-छोटे उपाय करून पाहिल्यास मोठ्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. हे उपाय करताना फक्त लक्षात ठेवा की, देवावरील तुमची श्रद्धा अढळ ठेवा. अर्ध्या मनाने घेतलेले उपाय तुम्हाला शुभ परिणाम देऊ शकत नाहीत.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

WhatsApp channel

विभाग