हनुमान जयंतीच्या दिवशी करा ‘हे’ काम; शनी प्रकोपापासून मिळेल मुक्ती!
By
Harshada Bhirvandekar
Apr 19, 2024
Hindustan Times
Marathi
हनुमान जयंती संदर्भात विविध धार्मिक मान्यता आहेत. यावेळी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरी होणारी हनुमान जयंती खूप खास आहे.
चैत्र पौर्णिमा तिथी २३ एप्रिल रोजी पहाटे ३.२४ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल रोजी पहाटे ५.१८पर्यंत चालेल.
हनुमान जयंती २३ एप्रिलला साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंगळवार असल्याने हनुमानाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील.
या दिवशी सकाळी स्नान करून भगवान हनुमानाचे ध्यान करून त्यांची पूजा करावी.
त्यांना फळे, लाडू आणि तुळशीचा हार अर्पण करावा. यासोबतच त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा.
यानंतर हनुमान चालीसाचे तीन किंवा पाच वेळा पठण करावे. यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात.
या दिवशी मोहरीचे तेल आणि काळे तीळ यांच्या उपायाने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि तुम्हाला शनिच्या प्रकोपापासूनही मुक्ती मिळते.
शनीची साडेसाती दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून त्याचा दिवा हनुमानाच्या समोर लावावा.
या उपायामुळे शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळू शकते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा