मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Odisha Train Accident : ओडिशा अपघातातील कुटुंबांना सहा महिने मोफत किराणा; 'या' कंपनीने केलं जाहीर

Odisha Train Accident : ओडिशा अपघातातील कुटुंबांना सहा महिने मोफत किराणा; 'या' कंपनीने केलं जाहीर

Jun 05, 2023, 08:21 PM IST

  • Coromandel Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताने प्रभावित झालेल्या कुटूंबांना पाठिंबा देण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने १०-सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अपघातग्रस्त कुटूंबाना सहा महिने मोफत राशन पुरवठा केला जाणार आहे. 

Odisha Train Accident 

Coromandel Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताने प्रभावित झालेल्या कुटूंबांना पाठिंबा देण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने १०-सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अपघातग्रस्त कुटूंबाना सहा महिने मोफत राशन पुरवठा केला जाणार आहे.

  • Coromandel Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताने प्रभावित झालेल्या कुटूंबांना पाठिंबा देण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने १०-सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अपघातग्रस्त कुटूंबाना सहा महिने मोफत राशन पुरवठा केला जाणार आहे. 

Coromandel Train Accident : ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला असून हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक लोक, संघटना व स्वंयसेवी संस्था मदतीसाठी पुढ सरसावल्या आहेत. या संघटनांमध्ये रिलायन्स फाउंडेशनही आहे. रिलायन्स फाउंडेशनने ट्रेन अपघातग्रस्तांसाठी १० कलमी योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये अपघातग्रस्तांच्या कुटूंबांना सहा महिने मोफत किराणा पुरवला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यापासून महिला सोडतायत घर, पती करतायत प्रज्वल रेवण्णाशी संबंधांची चौकशी

रिलायन्स फाऊंडेशन (RF) च्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे की, ओडिशातील रेल्वे अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, अशा कुटुंबांप्रती मी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने अत्यंत दु:खाने आणि जड अंतःकरणाने माझ्या संवेदना व्यक्त करत आहे. ओडिशा अपघाताची माहिती मिळताच, आमचे विशेष आपत्ती व्यवस्थापन पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले. आमची टीम २४  तास मदत आणि जखमींना मदत करत आहे. या अपघातामुळे झालेले दुःख आम्ही कमी करू शकत नसलो तरी आम्ही शोकग्रस्त कुटुंबांना त्यांचे जीवन पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी मदत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. या दुर्दैवी घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना आमचा पाठिंबा देण्यासाठी १०-सूत्री कार्यक्रम जाहीर करत आहोत. आमचे फाउंडेशन, रिलायन्स कुटुंबासह, या कठीण काळात बाधित समुदायांसोबत खंबीरपणे उभे आहे.

रिलायन्सकडून जाहीर करण्यात आलेली १० सूत्री मदत योजना –

  1. Jio-BP नेटवर्कद्वारे आपत्तीचा सामना करणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन.
  2. या अपघाताने प्रभावित झालेल्या कुटूंबांसाठी पुढील सहा महिने आटा, डाळ, खाद्यतेल, तांदूळ आदि रेशन रिलायन्स स्टोअरमधून देण्यात येईल.
  3. जखमींना मोफत औषधे; अपघातामुळे हॉस्पिटलायझेशनची गरज असलेल्यांसाठी मोफत वैद्यकीय उपचार.
  4. मानसिक व भावनिक आधारासाठी समुपदेशन सेवा
  5. अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटूंबातील एका सदस्याला जिओ आणि रिलायन्स रिटेलद्वारे आवश्यकतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
  6. या अपघातात जखमी व अपंगत्व आलेल्यांसाठी कृत्रिम हातपाय व व्हीलचेअर तसेच अन्य साधनांचा पुरवठा.
  7. नवीन रोजगार संधी शोधण्यासाठी अपघात प्रभावितांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण सेवा.
  8. या अपघातात घरातील कर्ता व कमावता पुरुष सदस्य गमावलेल्या महिलांसाठी सुक्ष्म अर्थपुरवठा व प्रशिक्षण योजना.
  9. या अपघाताने प्रभावित झालेल्या ग्रामीण कुटूंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून गाय, म्हैस व शेळ्या उपलब्ध करून दिल्या जातील.
  10. अपघातग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची उपजीविका पुन्हा उभारता यावी, यासाठी त्यांना एक वर्षासाठी मोफत मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.