मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अबब... IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पवई तलावातून काढला तब्बल ३ टन कचरा

अबब... IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पवई तलावातून काढला तब्बल ३ टन कचरा

Jun 05, 2023 07:34 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Powai lake :‘स्वच्छ पर्यावरण, हरित पर्यावरण’ हा संदेश देत, आयआयटी-बॉम्बेच्या 'अभ्युदय' टीमने रविवारी पवई तलावात स्वच्छता मोहीम राबवली. 

राज्यभरात आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्युदय टीमच्या सुमारे ४०० स्वयंसेवकांनी २ किमी लांबीच्या तलावाच्या परिसरात स्वच्छता करून तीन टन कचरा साफ केला. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना स्थानिक रहिवासी आणि आयआयटी प्राध्यापकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन पाठिंबा दिला. पवई तलाव हा मुंबई क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

१८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे.  पवई तलावातील पाणी हे क्षारयुक्त असल्याने त्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येत नाही. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

“स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तलावाच्या किनार्‍याची स्वच्छता करण्याच्या उद्दिष्ट असून आयआयटी बॉम्बेच्या सर्वात सुंदर परिसरांपैकी एक असलेल्या तलावाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे,” असे टीम अभ्युदयने सांगितले. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

“स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तलावाच्या किनार्‍याची स्वच्छता करण्याच्या उद्दिष्ट असून आयआयटी बॉम्बेच्या सर्वात सुंदर परिसरांपैकी एक असलेल्या तलावाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे,” असे टीम अभ्युदयने सांगितले. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज