मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Airplane Accident : धावपट्टी सोडून विमान उतरलं थेट नदीपात्रात, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Airplane Accident : धावपट्टी सोडून विमान उतरलं थेट नदीपात्रात, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Sep 25, 2022, 02:45 PM IST

    • Airplane Accident In France : मालवाहू विमान थेट नदीत उतरल्यानं एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे.
Airplane Accident Montpellier Airport In France (HT)

Airplane Accident In France : मालवाहू विमान थेट नदीत उतरल्यानं एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे.

    • Airplane Accident In France : मालवाहू विमान थेट नदीत उतरल्यानं एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे.

Airplane Accident Montpellier Airport In France : विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यानं किंवा वातावरण खराब झाल्यामुळं विमानाला तातडीनं लॅंडिंग करण्यात आल्याच्या बातम्या तुम्ही नेहमी ऐकल्या असतील. परंतु फ्रान्सच्या एका विमानतळाववर लॅंडिंग करत असलेलं मालवाहू विमान अचानक धावपट्टीवरून खाली घसरून थेट नदीपर्यंत पोहचल्याची घटना फ्रान्समधून समोर आली आहे. त्यामुळं विमानतळावर काही वेळ गोंधळ उडाला होता. सुदैवानं हे विमान नदीत गेलं नाही. त्यामुळं यात कोणतीही जीवीतहानी झाली नसून प्रशासनानं तातडीनं बचावकार्य करत पायलट आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना बाहेर काढलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या मोंपेली शहरातील विमानतळावर बोईंग ७३७ हे मालवाहू विमान धावपट्टीवर उतरत होतं. त्यावेळी अचानक विमान धावपट्टीवरून खाली घसरलं आणि थेट नदीकाठी पोहचलं. सुदैवानं हे विमान नदीत बुडालं नाही. त्यानंतर प्रशासनानं मोंपेली विमानतळ काही काळासाठी बंद केलं आहे. याशिवाय अग्निशामक दलानं तात्काळ विमानाला पाण्याबाहेर काढण्याचं काम सुरू केलं. त्यावेळी विमानाचं इंजिन पाण्यात बुडालेलं होतं.

<p>Airplane Accident In France</p>

या घटनेनंतर आता या अपघाताचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळं लोकांना या घटनेमुळं आश्चर्याचा धक्का बसला आणि स्थानिक लोकांनी या अपघातग्रस्त विमानाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

विभाग