मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agneepath Scheme : दंगलीत सहभागी असाल तर लष्कराचे स्वप्न विसरा; लष्कराने केले स्पष्ट

Agneepath Scheme : दंगलीत सहभागी असाल तर लष्कराचे स्वप्न विसरा; लष्कराने केले स्पष्ट

Jun 19, 2022, 05:23 PM IST

    • केंद्राच्या लष्करभरतीच्या अग्निपथ योजनेवरून देशातील बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यात विरोध सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून बिहार राज्यात अनेक रेल्वेगाड्या आंदोलकांनी पेटवून दिल्या. हे आंदोलन एकीकडे धघधगते असतांनाच लष्करान रविवारी पत्रकार परिषद घेतली. यात लष्करभरती ही अग्निपथ योजनेद्वारेच होणार असे स्पष्ट करत, जे तरुण दंगलीत सहभागी असतील त्यांना लष्करात प्रवेश मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Indian Army PC On Agneepath Scheme

केंद्राच्या लष्करभरतीच्या अग्निपथ योजनेवरून देशातील बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यात विरोध सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून बिहार राज्यात अनेक रेल्वेगाड्या आंदोलकांनी पेटवून दिल्या. हे आंदोलन एकीकडे धघधगते असतांनाच लष्करान रविवारी पत्रकार परिषद घेतली. यात लष्करभरती ही अग्निपथ योजनेद्वारेच होणार असे स्पष्ट करत, जे तरुण दंगलीत सहभागी असतील त्यांना लष्करात प्रवेश मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    • केंद्राच्या लष्करभरतीच्या अग्निपथ योजनेवरून देशातील बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यात विरोध सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून बिहार राज्यात अनेक रेल्वेगाड्या आंदोलकांनी पेटवून दिल्या. हे आंदोलन एकीकडे धघधगते असतांनाच लष्करान रविवारी पत्रकार परिषद घेतली. यात लष्करभरती ही अग्निपथ योजनेद्वारेच होणार असे स्पष्ट करत, जे तरुण दंगलीत सहभागी असतील त्यांना लष्करात प्रवेश मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Agneepath Scheme Protest देशात अग्निपथ योजनेवरुन हिंसाचार, जाळपोळ आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या आहेत. एकीकडे विरोध सुरू असतांना लष्करानं रविवार पत्रकार परिषद घेतली. यावेळी अग्नीपथ योजनेद्वारेच लष्करभरती होणार असल्याचे स्पष्ट करत, या योजतून लष्करात प्रवेश घेण्यापूर्वी आता तरुणांना दंगलीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ज्या तरुणांवर या पद्धतीचे गुन्हे दाखल असतील त्यांना आता लष्करभरतीचे स्वप्न विसरावे लागणार आहे, असे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

देशभरात लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. आता या प्रकरणावर लष्कराने पत्रकार परिषद गेत सविस्तर माहिती दिली आहे. लष्करान म्हटलं की, आम्हाला यामध्ये जास्ती जास्त तरुण सहभागी व्हावेत असं वाटत होतं, तरुणांचा सळसळंत रक्त आणि बुद्धी याचा समतोल राखला जाईल. तुम्हाला माहिती आहे की लष्कराती निवृत्त किती होतात. दरवर्षी तिन्ही दलात मिळून जवळपास १७ हजार जण स्वेच्छानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार असं त्यांनी कुणीही विचारत नाही.

 

अग्निवीरांना नेहमीच्या सैनिकांपेक्षा कमी सुविधा मिळत असल्याचा आरोप होतोय. त्यावर लष्कराने म्हटलं की, ‘अग्निवीरांना सियाचीन आणि इतर काही भागात रेग्युलर सैनिकांना ज्या सुविधा आहेत त्याच दिल्या जातील. त्यांच्या सेवा आणि अटींमध्ये काही बदल नसेल. लष्करात सेवा करताना वीरमरण आल्यास अग्निवीरांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिले जातील.’

सध्या आपण केवळ ४६ हजार सैनिकांची अग्निपथ योजनेतून भरती करत आहे. या योजनेची समीक्षा करण्यासाठी आपण कमी प्रमाणात भरती करत असून त्यादृष्टीने आवश्यक मूलभूत सोयीसुविधा आहेत की नाही हे तपासले जाईल असंही लष्कराने स्पष्ट केलं. यंदा ४६ हजारांची भरती करणार असलो तरी हे प्रमाण जवळपास १.२५ लाखापर्यंत जाईल अशी माहितीसुद्धा लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली.

जनरल पुरी म्हणाले, जे अग्निपथ योजनेत भरती होणा-या तरुणांना हिंसेत सहभागी नसल्याचे पोलिसांकडून पत्र घ्यावे लागणार आहे. हे पत्र असल्या शिवाय त्यांना लष्करात प्रवेश दिला जाणार नाही असेही, पुरी यांनी स्पष्ट केलं

एअर मार्शल एसके झा यांनी सांगितले की, ‘अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे रजिस्ट्रेशन २४ जूनला सुरू होईल. त्यानतंर २४ जुलैपासून पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेतल्या जातील. यातील पहिली बॅच डिसेंबर अखेरीस ट्रेनिंगसाठी दाखल होईल.

व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, देशात २१ नोव्हेंबरपासून पहिला नौदलातील अग्निवीर त्याच्या ट्रेनिंगला सुरुवात करेल. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्हींना संधी असेल.