मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agnipath Protest: जौनपूरमध्ये बसेस,बाईक व जीप जाळल्या, तुफान दगडफेकीत पोलीस जखमी

Agnipath Protest: जौनपूरमध्ये बसेस,बाईक व जीप जाळल्या, तुफान दगडफेकीत पोलीस जखमी

Jun 18, 2022, 09:23 PM IST

    • अग्निपथ योजनेच्या विरोधात आज जौनपूर शहरात हिंसक आंदोलन झाले. बदलापूर आणि लालाबाजारमध्ये अनेक बाईक, बसेस व जीप गाड्यांना आग लावण्यात आली. दोन बसेसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तुफान दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
जौनपूरमध्ये बसेस,बाईक व जीप जाळल्या

अग्निपथ योजनेच्याविरोधातआज जौनपूर शहरात हिंसक आंदोलन झाले.बदलापूरआणिलालाबाजारमध्ये अनेक बाईक, बसेस व जीप गाड्यांना आग लावण्यात आली. दोन बसेसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तुफान दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

    • अग्निपथ योजनेच्या विरोधात आज जौनपूर शहरात हिंसक आंदोलन झाले. बदलापूर आणि लालाबाजारमध्ये अनेक बाईक, बसेस व जीप गाड्यांना आग लावण्यात आली. दोन बसेसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तुफान दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले आणि तोडफोड सुरू केली. जौनपूर-प्रयागराज महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी अनेक मोटारसायकली, दोन बसेस व एक पोलीस व्हॅनवर दगडफेक वाहनांचे नुकसान दिले.

त्याचबरोबर सकाळी साडे नऊच्या सुमारास एक बस आणि एक जीपला आग लावली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करायला सुरूवात केली. स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रू धूराच्या कांड्या फोडल्या. त्यानंतरही आंदोलनकर्ते आक्रमक असल्याचे पाहून हवेत गोळीबार करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्थिती अजूनही तनावपूर्ण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

<p>जौनपूरमध्ये अनेक गाड्यांचे नुकसान</p>


राज्य माहिती आयुक्त प्रमोद तिवारी यांना स्कोर्ट करत घेऊन जाताना पोलिस व्हॅनवर बदलापूरजवळ दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व कर्मचारी राम सुजान यादव जखमी झाले. जौनपूर-प्रयागराज महामार्गावर दिवसभर जाम होता. बदलापूरमध्ये पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये एक किलोमीटरपर्यंत दगडफेक झाली. त्यानंतर आंदोलनकर्ते श्रीकृष्ण नगर रेल्वे रस्टेशनकडे गेले. घटनास्थळी अनेक पोलीस ठाण्यांमधून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली.

<p>जौनपूरमध्ये बसेस,बाईक व जीप जाळल्या</p>


बदलापूरमध्ये सकाळी सात वाजल्यापासून आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. तरुणांनी रोडवेज बसेस थांबवून रस्ता जाम केला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न केल्यानंतर स्थितीत बिघडली. तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जवळपास एक किलोमीटरपर्यंत आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये दगडफेक होत होती. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

पुढील बातम्या