मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

May 04, 2024, 08:46 PM IST

    • गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाळी गावात पार्सल बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. जितेंद्र वंजारा (वय ३२) आणि त्यांची मुलगी भूमिका (वय १२) अशी मृतांची नावे आहेत.
Parcel bomb killed two in Gujarat

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाळी गावात पार्सल बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. जितेंद्र वंजारा (वय ३२) आणि त्यांची मुलगी भूमिका (वय १२) अशी मृतांची नावे आहेत.

    • गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाळी गावात पार्सल बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. जितेंद्र वंजारा (वय ३२) आणि त्यांची मुलगी भूमिका (वय १२) अशी मृतांची नावे आहेत.

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाळी गावात पार्सल बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. जितेंद्र वंजारा (वय ३२) आणि त्यांची मुलगी भूमिका (वय १२) अशी मृतांची नावे असून पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयातून एका व्यक्तिने पार्सल बॉम्ब पाठवून हत्याकांड घडवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका रिक्षाचालकाने काळ्या रंगाचे टेप रेकॉर्डर असलेलं एक पार्सल जितेंद्र वंजारा यांच्या निवासस्थानी पोहोचवलं होतं. वंजारा यांनी त्यांच्या दोन मुली भूमिका आणि छाया तसेच शेजारी राहणारी मुलगी शिल्पा यांच्यासोबत एकत्र येऊन हे पार्सल उघडले होते. त्यात टेपरेकॉर्डरसदृष्य वस्तु होती. जितेंद्र वंजारा यांनी ती वस्तु इलेक्ट्रिकल पॉईंटमध्ये प्लग करण्याचा प्रयत्न केला असता जोरदार स्फोट झाला आणि दोघे जण जागीच ठार झाले होते. यासंबंधी वंजारा यांचा चुलत भाऊ प्रवीण वंजारा याने वडाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

वंजारा आणि त्यांची मुलगी भूमिका यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेत असाताना मृत्यू झाला होता. छाया आणि शिल्पा या मुली जखमी झाल्या असून त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र वंजारा यांच्या घरी पार्सल पोहचून देणारा ऑटोरिक्शाचालक आणि हे पार्सल तयार करणारा जयंती वंजारा या दोघांना अटक केली आहे. जयंती वंजाराला त्याची पत्नी आणि जितेंद्र वंजारा यांच्यादरम्यान अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यासंशयातून त्याने जितेंद्र वंजाराला संपवण्याची योजना आखली होती. त्यानुसार त्याने पार्सल बॉम्ब तयार करण्याची कृती शिकून घेऊन शेजारच्या राजस्थानमध्ये जाऊन साहित्य आणले होते, असं पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून पोलिसांनी पुरावे जमा केले आहे. स्फोट झाला तेव्हा जितेंद्र वंजारा यांची पत्नी घरात नव्हती.

याबाबत अधिक पुरावे गोळा केले जात असून पार्सल बॉम्ब तयार करण्याबाबत तसेच या हल्ल्यामागचा संपूर्ण हेतू आणि कट सिद्ध करण्यासाठी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

विभाग

पुढील बातम्या