Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

May 04, 2024 07:16 AM IST

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित असलेल्या तिघांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी संशयितांची ओळख पटली होती.

कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक
कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक (HT_PRINT)

Canadian Police arrest 3 Indians in Khalistan separatist Hardeep Singh Nijjar Murder Case : कॅनडाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित तिघा संशयितांना शुक्रवारी अटक केली आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (सीबीसी) याला दुजोरा दिला आहे. सीबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी निज्जरच्या हत्येमंगनिल काही संशयितांची ओळख पटवली होती. तेव्हापासून पोलिस त्यांच्यावर नजर ठेवून होते. या प्रकरणी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी अद्याप कोणतहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी अटक करण्यात आलेल्या  आरोपींची नावे आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतावर गंभीर आरोप केले होते. दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या भारतीय गुप्तचर विभागाने घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, भारताने हा आरोप फेटाळून लावत जस्टिन ट्रूडो यकणहे हे विधान बेताल असल्याचे सांगत पूर्णपणे फेटाळून लावले होते. जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले होते. दुसरीकडे, कॅनडा भारतावर तपासात सहकार्य करण्यासाठी दबाव आणत होता. यानंतर अमेरिकेने देखील खलीस्थानी दहशतवादी पन्नू याच्या हत्येचा कट हाणून पाडल्याचा आरोप केला होता.

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

गेल्या मार्चमध्ये, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर नऊ महिन्यांनंतर, या घटनेचे कथित व्हिडिओ फुटेज समोर आले होते. सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार हा व्हिडिओ दूरवर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, फुटेजची एकाहून अधिक स्त्रोतांकडून पडताळणी करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये, निज्जर त्याच्या राखाडी रंगाच्या डॉज राम पिकअप ट्रकमध्ये गुरुद्वाराच्या पार्किंगमधून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. पार्किंगच्या शेजारील लेनमध्ये एक पांढरी सेडान कारही त्याच्यासोबत जाताना दिसते. बाहेर पडताना जवळ येताच निज्जरच्या समोर एक पांढऱ्या रंगाची कार येऊन त्याचा ट्रक जवळ थांबवते. त्यानंतर, गाडीतून दोन बाहेर पडून ते ट्रककडे धावतात आणि निज्जरला गोळ्या घालतात आणि घटनास्थळावरून पळून जातात, सीबीएस न्यूजच्या अहवालात. हल्लेखोर टोयोटा कॅमरीन कारमध्ये पळून जाताना दिसत आहेत.

अल्बर्टा आणि ओंटारियो येथे कारवाई केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आल्याचे वृत्त कॅनडाच्या माध्यमांनी दिले आहे. अटक करण्यात आलेले तिघे भारतीय नागरिक असून ते २०२१ नंतर तात्पुरत्या व्हिसावर कॅनडामध्ये आले होते. त्यापैकी काही विद्यार्थी व्हिसावर होते, "कोणीही कॅनडामध्ये शिक्षण घेतलेले नाही. येथे कोणाचेही कायमस्वरूपी घर नाही असे मानले जात नाही. ते सर्व पंजाब आणि हरियाणामधील गुन्हेगारी गटाचे सहयोगी आहेत," असे सीबीसी न्यूजने सांगितले. हे तिघे पंजाबचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे देखील वृत्त आहे.

सूत्रांनी सीबीसी न्यूजला सांगितले की एडमंटनमधील एका ११ वर्षाच्या मुलाच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूसह कॅनडामधील तीन अतिरिक्त हत्यांशी हे आरोपी संबंधित आहेत. रे येथील गुरू नानक शीख गुरुद्वारामध्ये ज्या दिवशी निज्जरची हत्या झाली त्या दिवशी हिटर, ड्रायव्हर आणि स्पॉटर म्हणून वेगवेगळ्या भूमिका बजावल्याचा आरोप आरोपींनवर आहे. सूत्रांनी सांगितले की तपासकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी कॅनडातील आरोपींची ओळख पातळी होती. तसेच त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती.

पार्लमेंट हिलवर पत्रकारांशी बोलताना कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी या प्रकरणात भारत सरकारच्या सहभागाची पुष्टी करण्यास नकार दिला आणि या प्रश्नाचे उत्तर कॅनडाचे पोलिस अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतात. दरम्यान, संरक्षण मंत्री डॉमिनिक लेब्लँक म्हणाले, "मला कॅनडा सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर आणि आरसीएमपी आणि (कॅनेडियन) सुरक्षा गुप्तचर सेवेच्या कार्यावर पूर्ण विश्वास आहे."

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर