मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2024 12:04 PM IST

Thailand News : थायलंड येथे एका बड्या महिला नेत्याचा स्व:ताच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवतांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मुळे या महिला नेत्याला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून केली हकालपट्टी
मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून केली हकालपट्टी

Thailand News : थायलंड येथील राजकारणात मोठे वादळ उठले आहे. येथील एक ४५ वर्षीय महिला नेता सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या महिला नेत्याला तिच्या दत्तक मुलासोबत शारीरिक संबंध ठेवताना तिच्या पतीने रंगेहात पकडले. प्रपापोर्न चोईवाडकोह असे या महिला नेत्याचे नाव आहे. प्रपापोर्नचा मुलगा फक्त २४ वर्षांचा आहे. फ्रा महा असे त्याचे नाव असून त्याचा आणि त्याच्या आईचा शरीर संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर थायलंडच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. प्रपपोर्नचा पती टीआय याला त्यांच्या अफेअर बाबत संशय होता. पत्नी प्रपापोर्न हीला रंगेहाथ पकडण्यासाठी त्याने तिचा व मुलाचा पाच तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवत पाठलाग देखील केला.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

दत्तक मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध

प्रपापोर्न आणि टीआय यांनी फ्रा महा याला दत्तक घेतले होते. प्रपापोर्न या थायलंडच्या राजकारणातील मोठा चेहेरा आहे. त्या येथील बड्या नेत्या आहेत. प्रपापोर्न आणि फ्रा महा या मायलेकाचे गेल्या काही दिवसांपासून अफेअर सुरू होते. प्रपापोर्नने सांगितले की तिला तिच्या कृत्याबद्दल वाईट वाटले. टीआय याने फ्रा महावर पत्नीला फूस लावल्याचा आरोप देखील केला आहे. आई आणि मुलाच्या या व्हिडिओमुळे चीनसोबतच थायलंडमधील लोकांनाही धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी विविधी प्रकारच्या कमेन्ट देखील दिल्या आहेत.

sharad pawar : त्यांनी स्वतःचं कुटुंब कुठं सांभाळलं? नरेंद्र मोदी यांच्या टीकेला शरद पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

पक्षातून केले निलंबित

प्रपापोर्न यांना "मॅडम प्ली" असेही म्हणतात. थायलंडच्या सुखोथाई प्रांतात त्या प्रसिद्ध नेत्या आहेत. त्या सध्या स्थानिक चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा देखील आहेत. गेल्या वर्षी मार्चपासून त्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्या आहेत. गेल्या मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्या सक्रिय आहेत. त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाने प्रपापोर्न यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

टीआयने पत्नीला रंगेहात पकडल्यावर विचारले की, "तुम्ही दोघेही आनंदी आहात का?" त्यांच्या पत्नीने स्वतःचा बचाव केला आणि दावा केला की त्यांनी लैंगिक संबंध ठेवले नाहीत ते केवळ बोलत होते. फ्रायनेही तो निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की आमच्यात तसेले काहीही झाले नाही. केवळ मुलाच्या काही समस्यांसाठी प्रपापोर्न त्याला मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला.

पती टीआयने या संपूर्ण घटनेवर सांगितले की, "जेव्हा मला ते एकत्र दिसले तेव्हा मला राग आला. मला विश्वासघात झाल्याचे वाटले. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करत होतो. तिला अनेक सोन्याच्या गोष्टी देखील मी खरेदी करून दिल्या होत्या तसेच अनेक भेट वस्तु देखील दिल्या होत्या. मात्र, तिने माझा विश्वासघात केला.

IPL_Entry_Point