मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पावसाळ्यात हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात या पदार्थांचं करा सेवन!

पावसाळ्यात हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात या पदार्थांचं करा सेवन!

Jun 19, 2022, 02:57 PM IST

    • Home Remedies For Cold And Cough : पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होऊन त्यामुळं अनेक हंगामी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं, वाचा!
Home Remedies For Cold And Cough (HT)

Home Remedies For Cold And Cough : पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होऊन त्यामुळं अनेक हंगामी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं, वाचा!

    • Home Remedies For Cold And Cough : पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होऊन त्यामुळं अनेक हंगामी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं, वाचा!

Remedies For Monsoon Season : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील काही शहरांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उन्हाळ्यातल्या गरम झळांपासून लोकांना आराम मिळाला आहे. याशिवाय उन्हाळ्यात उष्णतेनं हैराण झालेल्या लोकांना गेल्या हंगामात आरोग्याची फार काळजी घ्यावी लागली होती. पावसाळ्यात वातावरणात गारवा निर्माण झालेला असला तरी ही काळजी कायम आहे. कारण पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याला विविध आजार होऊ शकतात. त्यामुळं या आजारांपासून बचाव करण्यासाठी कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी खा हे पदार्थ...

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी नियमितपणे दूधात हळदीचं समावेश करून त्याचं सेवन करायला हवं. त्यामुळं तुम्हाला सर्दी, खोकला आणि वायरल फ्लूपासून बचाव करण्यास मदत होईल. बदलत्या वातावरणानुसार शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यासाठी चवनप्राशचं सेवन करायला हवं. त्यामुळं पावसाळ्यातील कोणत्याही इ्नफेक्शनपासून तुमचा बचाव करण्यास मदत होईल.

याशिवाय पावसाळ्यात भिजल्यानंतर व्यक्तीला सर्दी किंवा खोकला होण्याची दाट संभावना असते. त्यासाठी व्यक्तीनं गरम पाण्याची वाफ घ्यायला हवी. त्यामुळं नाक आणि घश्यातील सूज कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या समस्येसाठी तुम्ही लवंग बारीक करून त्यात मध मिसळून त्याचं दिवसातून एक किंवा दोनवेळा सेवन करू शकता. त्यानं तुम्हाला खोकला आणि सर्दीपासून आराम मिळेल.

पावसाळ्यात व्यक्तीला विविध प्रकारच्या इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. त्यासाठी तुळशीचा काढा बनवून त्याचं सेवन करायला हवं किंवा चहा बनवताना तुळशीचं पानं आणि आलं मिसळा. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन्स होणार नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या