मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agneepath: पहाटे ४ ते रात्री ५ पर्यंत रेल्वे बंद, पूर्व मध्य रेल्वेचा निर्णय

Agneepath: पहाटे ४ ते रात्री ५ पर्यंत रेल्वे बंद, पूर्व मध्य रेल्वेचा निर्णय

Jun 19, 2022, 08:47 AM IST

    • हिंसाचारामुळे रेल्वेच्या २१० मेल एक्सप्रेस रद्द केल्या. तर १५९ पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या.
बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेल्वेला आग लावल्याच्या घटना (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

हिंसाचारामुळे रेल्वेच्या २१० मेल एक्सप्रेस रद्द केल्या. तर १५९ पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या.

    • हिंसाचारामुळे रेल्वेच्या २१० मेल एक्सप्रेस रद्द केल्या. तर १५९ पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या.

अग्निपथविरोधात (Agneepath) देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बिहारमध्ये (Bihar) रेल्वेने (Indian Railway) मोठी घोषणा केली आहे. १८ ते २० जून या कालावधीत पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत बिहारमध्ये कोणतीही रेल्वे सुरु राहणार नाही असं पूर्व मध्य रेल्वेकडून (East Central Railway) सांगण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सर्वाधिक हिंसाचार बिहारमध्ये झाला आहे. संतप्त जमावाने अनेक रेल्वेंना आग लावली आहे. शहरात इतर मालमत्तेचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ,रेल्वेच्या तोडफोड आणि जाळपोळीत फक्त बिहारमध्ये २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

हिंसाचारामुळे रेल्वेच्या २१० मेल एक्सप्रेस रद्द केल्या. तर १५९ पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या. दोन मेल एक्सप्रेस ट्रेन काही कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण ३७१ रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

पूर्व मध्य रेल्वेने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वेळेत काही बदल केले आहेत. रेल्वेने सांगितलं की, आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वेळेमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १८ जूनला रात्री ८ ते १९ जूनला पहाटे ४ पर्यंत तर १९ जूनला रात्री ८ ते २० जूनला पहाटे ४ पर्यंतच पूर्व मध्य रेल्वे मार्गावर बिहारमध्ये रेल्वे वाहतूक होईल.

अग्निपथ योजनेचा विरोध हिंसक झाल्यानं गेल्या २ दिवसांपासून बिहारमधून जाणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेक रेल्वे रद्द कराव्या लागल्या तर काही रेल्वेंना उशीर झाला. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यात रुग्णांना आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांना त्रास झाला.

विभाग

पुढील बातम्या