मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : ठाकरे चित्रपटासाठी पत्राचाळ घोटाळ्यातला पैसा वापरला; पाटकरांचा राऊतांवर गंभीर आरोप

Sanjay Raut : ठाकरे चित्रपटासाठी पत्राचाळ घोटाळ्यातला पैसा वापरला; पाटकरांचा राऊतांवर गंभीर आरोप

Sep 21, 2022, 12:42 PM IST

    • Swapna Patkar vs MP Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
Swapna Patkar vs MP Sanjay Raut (HT)

Swapna Patkar vs MP Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

    • Swapna Patkar vs MP Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

Patrachal Scam In Goregaon Mumbai : गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले खासदार संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा शिवसेनेकडून ठाकरे चित्रपटासाठी वापरण्यात आल्याचा आरोप स्वप्ना पाटकरांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता या मुद्द्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

काही दिवसांपूर्वीच ईडीनं स्वप्ना पाटकरांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर आता त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेवर आरोप करताना त्या म्हणाल्या की, पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊतांनी २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ठाकरे चित्रपटासाठी वापरला होता, त्यामुळं आता या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी कोर्टानं संजय राऊतांना जामीन द्यायला नकार देत कोठडीत १४ दिवसांची वाढ केली होती. त्यानंतर आता पाटकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं या प्रकरणातही ईडी कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान संजय राऊत यांना कोर्टानं तिसऱ्यांदा जामीन नाकारला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं या प्रकरणात राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती ईडीनं कोर्टाला केली होती. त्यानंतर आता त्यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. परंतु आता स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना आणि राऊतांवर केलेल्या आरोपांमुळं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

नवाझुद्दीन सिद्धिकीच्या मुख्य भूमिकेत असलेला ठाकरे हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिवसेनेचा ५० वर्षांचा इतिहास, तात्कालीन राजकीय घडामोडी आणि पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका याबाबत भाष्य करण्यात आलं होतं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा