मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : कॉंग्रेस आमदाराचं तुंबलेल्या पाण्यात आंदोलन, रस्ता दुरुस्तीची मागणी; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : कॉंग्रेस आमदाराचं तुंबलेल्या पाण्यात आंदोलन, रस्ता दुरुस्तीची मागणी; व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 12:04 PM IST

Congress MLA Jharkhand : काही दिवसांपूर्वी रोडच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. परंतु अजूनही काम सुरू न झाल्यानं महिला आमदारानं रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केलं.

Viral Video Of Congress MLA In Jharkhand
Viral Video Of Congress MLA In Jharkhand (HT)

Viral Video Of Congress MLA In Jharkhand : पावसाळ्यात अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली जात असतानाच आता झारखंडमध्ये कॉंग्रेसच्या एका महिला आमदारानं रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३३ च्या कामाचं कंत्राट देण्यात आलं होतं. परंतु प्रत्यक्ष कामच सुरू न झाल्यानं महिला आमदाराचा पारा चढला. या आंदोलनाचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

झारखंडमधील राष्ट्रीय (१३३) महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यात पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. त्यामुळं अनेक लोकांनी कॉंग्रेसच्या आमदार दीपिका सिंह पांडेय यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर याविरोधात आक्रमक होत रस्त्यातील खड्ड्यांत बसून आंदोलन सुरू केलं. रस्त्यावरील खड्ड्यात बसल्यानंतर सिंह यांनी रस्त्यावर साचलेलं पाणी अंगावर ओतून केंद्र सरकारचा निषेध केला.

दीपिका पांडेय या गोड्डातील महगामातून आमदार आहेत. या जिल्ह्यातून निशिकांत दुबे हे खासदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गोड्डातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले होते. त्याचा स्थानिक लोकांना फार त्रास होत होता. या आंदोलनावेळी आमदार सिंह यांनी खासदार निशिकांत दुबे यांनी रस्त्याचं काम अडवल्याची टीका केली आहे. याशिवाय हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यानं त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

IPL_Entry_Point