मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gang Rape Case : मुलीच्या अपहरणानंतर सामूहिक बलात्कार; विवस्त्र पळवलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Gang Rape Case : मुलीच्या अपहरणानंतर सामूहिक बलात्कार; विवस्त्र पळवलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 10:43 AM IST

Gang Rape Case : अल्पवयीन मुलीचं काही दिवसांपूर्वी पाच आरोपींनी अपहरण केलं होतं. त्यानंतर आता तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Gang Rape Case In Moradabad
Gang Rape Case In Moradabad (HT_PRINT)

Gang Rape Case In Moradabad : काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आता मुरादाबादमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जत्रेतून घरी परतणाऱ्या एका मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय आरोपींनी पीडित मुलीची विवस्त्र पळवल्याचा काढल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोरादाबादमधील भोजपूरमध्ये जत्रा पाहून घरी परतणाऱ्या १५ वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर पाच आरोपींनी तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी तिथं शेतीत पाणी भरणाऱ्या एका शेतकऱ्याला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं तो तिथं गेला, त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याशिवाय त्यांनी मुलीलाही विवस्त्र पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय काही आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही काढून त्याला व्हायरल केलं.

त्यानंतर आता पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नोएडा, गाझियाबाद आणि दिल्लीलगतच्या भागांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं समोर येत आहे. त्यातच आता मोरादाबादमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. यावरुन आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

IPL_Entry_Point