मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tirumala Tirupati Devasthanam : मुस्लिम जोडप्याने तिरूपती देवस्थानाला दिले तब्बल १.०२ कोटींचे दान

Tirumala Tirupati Devasthanam : मुस्लिम जोडप्याने तिरूपती देवस्थानाला दिले तब्बल १.०२ कोटींचे दान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 08:29 AM IST

Muslim Couple From Chennai Donate ₹1.02 Crore To Lord Venkateswara : चेन्नई येथील एका मुस्लिम जोडप्याने तिरूपती देवस्थानाला नव्या मंदिरासाठी तब्बल १.०२ कोटी रुपयांचे दान दिले आहे. यात ८७ लाख रुपयांची भांडी आणि फर्निचर आणि १५ लाख रुपयांचा धनादेश देखील दिला आहे.

मुस्लिम जोडप्याने तिरूपती देवस्थानाला दिले तब्बल १.०२ कोटींचे दान
मुस्लिम जोडप्याने तिरूपती देवस्थानाला दिले तब्बल १.०२ कोटींचे दान

नवी दिल्ली: तिरूपती देवस्थानाला रोज मोठ्या प्रमाणात देणग्या आणि भेटवस्तू मिळत असतात. यात मोठ्या उद्योजकांपासून तर साधे भाविक त्यांच्या परीने दान देत असतात. मात्र, चेन्नईस्थित एका मुस्लिम जोडप्याने तब्बल १.०२ कोटी रुपयांचे दान हे तिरूपती देवस्थानाला दिले आहे. सुबीना बानू आणि अब्दुल गनी असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी देवस्थानाला १.०२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जगातील सर्वात श्रीमंत मंदिराच्या कारभाराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे धनादेश सादर केला. एकूण रकमेपैकी, देणगीमध्ये नव्याने बांधलेल्या श्री पद्मावती विश्रामगृहासाठी ८७ लाख किमतीचे फर्निचर आणि भांडी आणि अन्नप्रसादम ट्रस्टसाठी १५ लाख रुपयांचा डीडी DD देण्यात आला आहे. त्यांनी तिरुमला मंदिरातील रंगनायकुला मंडपम येथे टीटीडी ईओ एव्ही धर्मा रेड्डी यांना हा डीडी सुपूर्द केला.

IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बालाजी मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराला अब्दुल गनी या व्यावसायिकाने देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्याने मंदिराला मोठी रक्कम दान केली आहे. २०२० मध्ये, कोरोना काळात त्यांनी मंदिराच्या आवारात जंतुनाशक फवारण्यासाठी बहु-आयामी ट्रॅक्टर-माउंट स्प्रेअर यंत्र दान केले होते. तर त्या पूर्वी त्यांनी भाजीपाला वाहतूक करण्यासाठी ३५ लाख रुपयांचा रेफ्रिजरेटर ट्रक मंदिराला दान केला होता.

घणी यांनी दान देण्याच्या आदल्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी तिरुमला मंदिराला १.५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध टेकडी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर, अंबानी यांनी तिरुमला येथील रंगनायकुला मंडपम येथे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे प्रमुख धर्मा रेड्डी यांना डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला होता. या नंतर त्यांनी मंदिरात अभिषेक देखील केला होता. त्यांनी तिरुमला येथील एसव्ही गोशाळेलाही भेट दिली. आंध्र प्रदेशचे खासदार गुरुमूर्ती, विजयसाई रेड्डी आणि चंद्रगिरीचे आमदार सी भास्कर रेड्डी हे देखील यावेळी उपस्थित होते.

एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची कन्या असलेल्या राधिका मर्चंटसह अंबानी आणि आरआयएलचे इतर अधिकारी शुक्रवारी पहाटे पहाटे दर्शनशी आले होते. यापूर्वी, अंबानी यांनी २०१० मध्ये तिरुमला मंदिराला ५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यावेळी मंदिरासाठी TTD च्या चालू असलेल्या १०० कोटी रुपयांचा सोन्याचा मुलामा देण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही देणगी देण्यात आली होती.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या