मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

May 06, 2024, 10:44 PM IST

  • vijay wadettiwar News : हेमंत करकरेप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवारांविरुद्ध भाजपची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

vijay wadettiwar News : हेमंत करकरेप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • vijay wadettiwar News : हेमंत करकरेप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेमंत करकरे प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप आक्रमक झाला असून त्यांनीमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे (Chief Electoral Officer) तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणीगुन्हा दाखल करण्याची मागणीभाजपनेकेली आहे.विजय वडेट्टीवारांचा आरोप तथ्यहीन असूनत्यांनी आचारसंहिते उल्लंघन केल्याबरोबरच न्यायालयाचाही अवमान केल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

भाजपने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तानच्या समर्थनात वक्तव्य केलं आहे. त्यांनी निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघन केल्यानं त्याच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी केली आहे. वडेट्टीवार यांचं वक्तव्य गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचे भाजपनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

भाजपने पत्रात म्हटलं आहे की, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांना मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घातल्याचा निराधार दावा करून मतदारांची दिशाभूल केली आहे. तसेच समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची आणि पक्षाची बदनामी केली आहे.

भाजपने म्हटले आहे की,वडेट्टीवार यांचे आरोप निराधार आहेत तसेच राजकीय प्रतिस्पर्ध्याला बदनाम करणारे आहेत. त्यांची कृती निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी आहे. त्यांनी आपल्या सशस्त्र दलांच्या आणि पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे,अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्यावर पाकिस्तानी दहशतवाद्याने नाही तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घाडल्या. विशेष म्हणजेही गोष्ट देशद्रोही वकील उज्जवल निकम यांनीलपवून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला लोकसभेचं तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा थेट सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या