Vijay Karanjkar joined Eknath Shinde led Shiv Sena : नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी विजय करंजकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या सोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं करंजकर नाराज होते. शिंदे गटातून तिकिटासाठी ते इच्छुक होते. मात्र, महायुतीमध्ये नाशिकसाठी मोठी स्पर्धा होती. त्यामुळं करंजकर यांना संधी मिळाली नाही. तिथं महायुतीनं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. असं असतानाही करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. करंजकर यांची शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.