Lok sabha Election : लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले अल्पसंख्यांक नेते नसिम खान (nasim khan) यांना तिकीट न मिळाल्याने नाराज झाले होते. मात्र नसिम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला अखेर यश आलं आहे. नसिम खान यांनी उत्तर मध्य मुंबईतून लढण्याची तयारी केली होती. मात्र काँग्रेसने या जागेवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना तिकिट दिलं. यानंतर नसिम खान यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता नसिम खान यांनी प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेत आपण काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
नसिम खान म्हणाले, काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाची मी राजीनामा मागे घेत आहे. तसेच काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे त्यांनी मागे घ्यावा. राहुल गांधी यांच्या लढ्यात सर्वांनी एकत्र यावं. देशातील संविधान बदलण्याचे जे कट कारस्थान सुरू आहे. त्याला विरोध करण्यासाठी तसेच जनतेला न्याय देण्यासाठी इंडिया आघाडीला बळकट करायचं आहे, असंही नसिम खान यांनी म्हटलं.
उत्तर मध्य लोकसभेचा तिढा सोडवण्यात महाआघाडीला यश आल्यानंतर ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. येथून नसिम खान निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र आयत्यावेळी नसिम खान यांना डावलून वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. उमेदवारी डावलल्यानं मिळाल्याने नसिम खान नाराज होते. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला होता. त्यातच काँग्रेसने महाराष्ट्रातील एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने काँग्रेसने राज्यातील मुस्लिमांची नाराजी ओढावून घेतली होती.
मात्र काँग्रेसने नसिम खान यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगून राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेत येत्या दोन दिवसात राजीनामा मागे घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं.
नसिम खान यांनी म्हटलं की, काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर मी अल्पसंख्याक समाजाची भावना व्यक्त केली. ज्येष्ठ नेत्यांपुढे माझी भावना व्यक्त केली. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे, वेणूगोपाल जी, रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात सर्व नेत्यांनी या भावनेचा सन्मान केला आहे. भविष्यात संधी देऊ असे मला सर्वांनी सांगितलं आहे. जिथे चुकीचे होत असेल, समाज पक्षापासून दूर जाणार असेल तर माझी भावना मांडली. ती माझी जबाबदारी आहे. पक्ष नेत्यांनी याची दखल घेतल्याने मी सर्वांचा आधार आहे.
संबंधित बातम्या