Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

May 05, 2024 04:15 PM IST

Vijay Wadettiwar : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळीने नव्हे तर पोलिसांच्या गोळीने झाल्याचा खळबळजक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य
कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Vijay wadettiwar On RSS : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होणार आहे. निवडणूक प्रचारात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडला असून राज्यातील राजकारण कमालीचे तापलं आहे. भाजपने माजी सरकारी वकील उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेसने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा पुन्हा उकरुन काढला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभा विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.

या हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी हेमंत करकरे  (Hemant Karkare) यांच्यावर पाकिस्तानी दहशतवाद्याने नाही तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घाडल्या. विशेष म्हणजेही गोष्ट देशद्रोही वकील उज्जवल निकम यांनीलपवून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला लोकसभेचं तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा थेट सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना (Ujwal Nikam) लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. निकम यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात सरकारची बाजू मांडत दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवले होते. निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड रिंगणार आहेत. निकम यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उकरून काढला आहे.

वडेट्टीवारांच्या विधानानंतर भाजपकडून पलटवार केला जात आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, उज्ज्वल निकम सच्चे देशभक्त असल्याने आम्ही तिकीट दिले. उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केल्याचे काँग्रेस नेते सांगतात म्हणजे त्यांना मुंबईत बॉम्बस्फोट घडवून अनेकांचे बळी घेणाऱ्या अजमल कसाबची चिंता आहे. आमची महायुती उज्ज्वल निकमांसारख्या देशभक्तासोबत आहे, तर महाविकास आघाडी अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यांसोबत आहे. कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे मतदारांनी ठरवावावे.

भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर टीकाकरत म्हटले की,आता मला समजले की, काँग्रेस पक्षाला थेट पाकिस्तानमधून आशीर्वाद का येत आहेत. हे तेच उज्ज्वल निकम आहेत, ज्यांनी राष्ट्रहितासाठी आपल्या वकिलीतून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला फासावर नेले. नक्षलवाद्यांना शहीद म्हणणारे आणि लष्कराला बलात्कारी म्हणणारेच खरे देशद्रोही आहेत.

Whats_app_banner