मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalbaugcha Raja : रस्त्यावर खड्डे पाडल्या प्रकरणी लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाला साडेतीन लाखांचा दंड

Lalbaugcha Raja : रस्त्यावर खड्डे पाडल्या प्रकरणी लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाला साडेतीन लाखांचा दंड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 11:16 AM IST

Notice to Raja Mandal of Lalbagh regarding potholes : गणेशोत्सव काळात रस्त्यावर खड्डे पडल्या प्रकरणी लालबागच्या राजा मंडळाला नोटिस पाठवण्यात आली आहे. प्रती खड्डा २ हजार रुपये असा ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड मंडळाला ठोठावण्यात आला आहे.

The Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal
The Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal (ANI)

मुंबई : संपूर्ण राज्यात तब्बल २ वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईतही मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंडळांनी मांडव घालण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले. यामुळे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. यामुळे महानगर पालिकेने खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्या मंडळांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. लालबागचा राजा मंडळाने परिसरात, रस्ते, पदपथ याठिकाणी बेकायदेशीरपणे १८३ खड्डे खोदले. त्यामुळे पालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयाने मंडळाला प्रति खड्डा २ हजार रुपये या प्रमाणे ३ लाख ६६ हजार इतका दंड केला आहे. यासंदर्भात पालिकेने मंडळाला नोटीस बजावली आहे.

गणेशोत्सवात मंडळांनी विविध देखावे सादर केले होते. हे देखावे रस्त्यावर तयार करण्यात आले होते. यासाठी खड्डे खोदण्यात आले आले. यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महेश वेंगुर्लेकर यांनी, ‘ई’ विभागाकडे २०२२ च्या गणेशोत्सवात लालबागचा राजा मंडळाने अनधिकृपणे पाडलेल्या खड्ड्यांची स्थिती आणि दंडाची माहिती अधिकारात मागितली होती. यात हे उघड झाले आहे. लालबागचा राजा, खेतवाडी, परळ, भायखळा, गिरगाव आदी गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

मुंबईत लालबागचा राजा मंडळाचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या गणरायचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. अनेक नागरिक लालबागचा राजाला मोठ्या प्रमाणात भेट वस्तुही देत असतात. या वर्षी या मंडळाने बॅरिकेड्स लावताना रस्त्यावर अनधिकृतपणे १८३ खड्डे खोदले. यामध्ये, पदपथावरिल ५३ खड्डे आणि रस्त्यावरील १५० असे एकूण १८३ खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे रस्त्याचे नुकसान झाले असून पालिका प्रशासनाने, पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार याप्रमाणे मंडळाला १८३ खड्डयांप्रकरणी ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. हा दंड भरण्यासाठी पालिकेने मंडळाला नोटीस देखील बजावली आहे. रक्कम ‘ई’ वॉर्ड विभाग कार्यालयात तातडीने भरावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या