मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Boy committed Suicide : स्पर्धा परीक्षेतील नैराश्य; पुण्यात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Boy committed Suicide : स्पर्धा परीक्षेतील नैराश्य; पुण्यात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 12:15 PM IST

Boy committed Suicide : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाने आत्महत्या केली. नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीतून उघड झाले आहे.

पुण्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
पुण्यात विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : पुण्यात नवी पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलाने नैराश्यातून गळफास घेऊं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी घडली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने चिट्ठी लिहिली असून त्याने नैराश्य आल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याने त्यात म्हटले आहे.

त्रिगुण कावळे (वय ३०, सध्या रा. नवी पेठे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिगुण कावळे हा तरुण मुळचा जालना येथील आहे. तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आला होता. तो नवी पेठेतील राही अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर मित्रासोबत राहत होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे त्याचे मित्र सकाळीच रूममधून अभ्यासिकेवर गेले होते. दुपारी ते रूमवर आल्यावर रूम बंद होती. त्यांनी त्रिगुणला आवाज दिला मात्र, आतमधून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळाली नाही. त्यांना शंका आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस आले. त्यांनी दरवाजा उघडला असता त्रिगुनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने त्याला खाली उतरवले. त्याला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी त्याच्या जवळ चिट्ठी आढळली आहे. यात त्याने त्याच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. नैराश्यातून आत्महत्या करीत आहे.” असे त्याने या चिठ्ठीत म्हटले आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणत राज्यातून मुले येत असतात. मात्र, अनेक वर्ष अभ्यास करूनही परीक्षेत यश येत नसल्याने तरुण हे निराश होत आहे. त्यात एमपीएससीच्या बोगस कारभारामुळे तसेच परीक्षा या वेळेवर होत नसल्याने अभ्यास करूनही परीक्षा अनेकांना देता येत नसल्यानेही तरुण निराश होत आहे. यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल तरुण मुले उचलत आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग