मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire : पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग, परिसरात धुराचे लोट; पाहा व्हिडिओ

Pune Fire : पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग, परिसरात धुराचे लोट; पाहा व्हिडिओ

Apr 19, 2024, 06:08 PM IST

  • Pune Fire News: पुणे येथील विमानगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग लागली.

पुण्यातील फिनिक्स सिटी मॉलला आज दुपारी आग लागली.

Pune Fire News: पुणे येथील विमानगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग लागली.

  • Pune Fire News: पुणे येथील विमानगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग लागली.

Pune Phoenix Market city Mall Fire: पुण्यातील (Pune) विमाननगर (Viman Nagar) परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या (Phoenix Market city Mall) वरच्या मजल्यावर आज (१९ एप्रिल २०२४) दुपारी आग लागली. या घनटेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Pune yerwada firing : पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार! येरवड्यात पहाटे जुन्या वादातून एकावर गोळीबार; ६ जणांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, दोन वॉटर टँक आणि एक ब्रॉन्टो घटनास्थळी रवाना झाल्या. फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे, जे कोरोना महामारीच्या काळापासून बंद होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० ते ५० जवानांनी कर्तव्य बजावले.

Pune Kondhwa Murder : बांधकाम पर्यवेक्षकाला चाकूने भोसकून इमारतीवरून फेकून दिले! कोंढवा येथील धक्कादायक घटना

मुंबई: मालाडमधील बहुमजली इमारतीला आग

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या गिरनार गॅलेक्सी बिल्डिंगला मंगळवारी (१६ एप्रिल २०२४) संध्याकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत एकूण ११ जण होरपळल्याची माहिती आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. इमारतीला आग कशी लागली? त्याची कारणे अद्याप कळू शकलेली नाही.

पुण्यातील क्लस्टर स्ट्रक्चरला आग लागली

पुणे शहरातील पेठ परिसरात मंगळवारी दुपारी दोन मजली क्लस्टर स्ट्रक्चरला आग लागली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा