मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Kondhwa Murder : बांधकाम पर्यवेक्षकाला चाकूने भोसकून इमारतीवरून फेकून दिले! कोंढवा येथील धक्कादायक घटना

Pune Kondhwa Murder : बांधकाम पर्यवेक्षकाला चाकूने भोसकून इमारतीवरून फेकून दिले! कोंढवा येथील धक्कादायक घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2024 04:53 PM IST

Pune Kondhwa Murder : पुण्यात कोंढवा (Pune Kondhwa Crime) येथे बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. यानंतर त्याला इमारतीवरून खाली फेकून देण्यात आले. ही घटना एका बांधकाम सुरू आलेल्या इमारतीत घडली.

बांधकाम पर्यवेक्षकाला चाकूने भोसकून इमारतीवरून दिले फेकून! धक्कादायक घटनेने कोंढवा हादरले
बांधकाम पर्यवेक्षकाला चाकूने भोसकून इमारतीवरून दिले फेकून! धक्कादायक घटनेने कोंढवा हादरले

Pune Kondhwa Murder : पुण्यात गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आज पहाटे काडीपेटी मागण्याच्या कारणावरून गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना कोंढवा येथे एका बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. यानंतर त्याला इमारतीवरून फेकून देण्यात आले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

Arvind Kejriwal : जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जेलमध्ये मुद्दाम आंबे, मिठाई खातायत; ईडीचा न्यायालयात दावा

पंकज कुमारमोती कश्यप (वय ३५, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) असे खून झालेल्या पर्यवेक्षकाचे नाव आहे. ही घटना कोंढवा भागातील स्टर्लिंग सोसायटीच्या फेज सहा परिसरात घडली. या परिसरात एक जण मृतावस्थेत पडल्याचे एका व्यक्तीला दिसले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांचे पथक हे घटनास्थळी आले.

त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत मृत व्यक्तीची ओळख पटवली. यावेळी संबंधित व्यक्ति ही पंकज कुमारमोती कश्यप असून तो बांधकाम पर्यवेक्षक असल्याचे कळले. आरोपीने त्याच्याचेहऱ्यावर चाकूने वार केले होते.

lightning : वादळी पावसात वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्याल? हे उपाय करून राहा सुरक्षित

तसेच त्याच्या पोटात चाकूने भोसकून त्याला इमारतीवरुन खाली ढकलून दिले होते. पंकज याकहा खून नेमका का करण्यात आला, याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत.

दुचाकी वापरल्याने वडील रागावल्याने मुलाची आत्महत्या

दुचाकी वापरल्याने वडील रागवल्याच्या कारणातून एका मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घटना पुण्यातील उरळी कांचन परिसरात गुरुवारी घडली. श्रीराज संतोष सोनवणे (१६, रा. दत्तवाडी, उरळी कांचन) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. श्रीराजने नुकतीच नववीची परीक्षा दिली होती. तो उरळी कांचन भागात एका शाळेत शिक्षण घेत होता. दुचाकी वापरण्याच्या कारणावरून वडील रागवल्याने श्रीराज याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

IPL_Entry_Point

विभाग