मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhatrapati Sambhaji Nagar : धक्कादायक! पोटच्या लेकानं बापाला संपवलं, नंतर दाबू लागला आईला गळा, इतक्यात..

Chhatrapati Sambhaji Nagar : धक्कादायक! पोटच्या लेकानं बापाला संपवलं, नंतर दाबू लागला आईला गळा, इतक्यात..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 17, 2024 12:16 AM IST

Chhatrapati Sambhaji Nagar : कर्जबाजारीला कंटाळून तरुणाने बापाचा खून केला. त्यानंतर आईलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संभाजीनगर शहरात खळबळ माजली आहे.

इनसेटमध्ये आरोपी मुलगा व मृत वडील
इनसेटमध्ये आरोपी मुलगा व मृत वडील

आई-वडील व भाऊ-बहिणीचे नाते सर्वात पवित्र नाते समजले जाते. मात्र संपत्तीच्या हव्यासाठी जमिनीसाठी रक्ताची नातीच एकमेकांच्या जीवावर उठतात. सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. संपत्तीच्या वादातून एकमेकांचे खून पडल्याच्या घटना आपण नेहमी ऐकत किंवा वाचत असतो. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने जन्मदात्या बापाला संपवल्यानंतर आईचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. 

ट्रेंडिंग न्यूज

कर्जबाजारीला कंटाळून आरोपी मुलाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुलाने बापाचा खून केल्यानंतर आईलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील डीलक्स पार्क येथे घडली. 

श्रीकृष्ण पाटील (वय ६२ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबातील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते. मंगळवारी सकाळी त्यांची मुलगी आईच्या ओरडण्याच्या आवाजाने जागी झाली. तिने खोलीत डोकावून पाहिले असता रोहित त्याच्या आईच्या अंगावर बसून तिचा गळा दाबत होता. हे पाहताच मुलीने जोरात ओरडायला सुरूवात केली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. यानंतर मुलीने घराच्या हॉलमध्ये पाहिले असता श्रीकृष्ण पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. 

शेजाऱ्यांच्या मदतीने तिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपीला काही तासात ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कर्जबाजारीपणाला कंटाळून बापाची हत्या केल्याची कबूली त्याने दिली. आरोपीविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

प्रियकरानं भिंतीवर डोकं आपटून केली प्रेयसीची  हत्या -

मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील एका इमारतीतील २७ वर्षीय सुरक्षा रक्षकाला समता नगर पोलिसांनी प्रेयसीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. डंबर बहादूर असे आरोपीचे नाव असून त्याची सहा महिन्यांपूर्वी केअरटेकर हेमकुमारी भट्ट (वय, ३०) हिच्याशी ओळख झाली. नेपाळचे असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनीही मद्यपान केले. यानंतर मृत तरुणी आपले दोन लग्न मोडल्यांचा विचार करून भावूक झाली आणि स्वत:चे डोके भिंतीवर आपटण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिने आरोपीला ढकलले. यावर तो चिडला आणि तिचे भिंतीवर जोरात डोके आपटले. रविवारी सकाळी तरुणीला जाग न आल्याने आरोपीने सोसायटीच्या सदस्यांना बोलावून रुग्णालयात नेले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग