राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू असून प्रचारासाठी उमेदवार व कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. धाराशिव मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailash Patil) यांना उष्माघाताने चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar)यांच्या प्रचार रॅलीदरम्यान ही घटना घडली. त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ नजिकच्या रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकांतील प्रचाराबरोबरच तापमानाचा पाराही वाढत आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. शिवसेना आमदार कैलास पाटील यांना आज उष्माघाताचा मोठा फटका बसला. खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा भर उन्हात सुरू होती. यावेळी चक्कर येऊन कैलास पाटील रस्त्यावरच कोसळले.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी रोहित पवार,आदित्य ठाकरे,अमित देशमुख आदि उपस्थित होते. खासदार ओमराजे निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये सहभागी झालेले धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास होऊन ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यामुळे रॅलीदरम्यान एकच गोंधळ उडाला.
संबंधित बातम्या