टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
अशा स्थितीत टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे. द्रविडचा करार T20 विश्वचषकानंतर संपुष्टात येईल पण त्याला पुन्हा अर्ज करण्याचा अधिकार असेल. बीसीसीआय २७ मे पर्यंत अर्ज मागवत आहे तर IPL फायनल २६ मे रोजी आहे. नवीन प्रशिक्षकासाठी काही नावे चर्चेत आहेत.
व्ही व्ही एस लक्ष्मणने अर्ज केला तर तो सर्वोत्तम पर्याय असेल. ४९ वर्षीय लक्ष्मण हा ३ वर्षांपासून एनसीए प्रमुख आहे आणि त्याला युवा भारतीय क्रिकेटपटूंबाबत चांगली माहिती आहे. द्रविड रजेवर असताना तो वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळयचा.
त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आशियाई गेम्स, ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका आणि इंग्लंड, न्यूझीलंड आणि आयर्लंडमध्ये मालिका खेळल्या आहेत.
गौतम गंभीरला प्रत्येक फॉरमॅट समजतो. त्याचे तांत्रिक कौशल्य नाकारता येणार नाही. केकेआरचा कर्णधार म्हणून दोन आयपीएल विजेतेपदे जिंकण्याव्यतिरिक्त, पहिल्या दोन वर्षांत लखनऊ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये नेण्याचे श्रेय त्याच्याकडे आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाखलाली केकेआरने आयपीएलच्या या मोसमात शानदार पुनरागमन केले आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता त्याच्यासारखा स्वाभिमानी माणूस या पदासाठी अर्ज करतो की नाही हे पाहायचे आहे. तथापि, केकेआर आणि त्याचा मालक शाहरुख खान यांच्याशी त्याची भावनिक नातं त्याला असे करण्यापासून रोखू शकते.
ऍशेस आणि टी-20 विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर हा चांगला रणनीतीकार आणि शिस्तीच्या बाबतीत कठोर आहे. तो अलीकडेच म्हणाला की तो भारताचा प्रशिक्षक होण्याच्या शक्यतेचा विचार करू शकतो. पण हे मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने खूप तणावाचे काम आहे.