मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Complaint against Gadkari : नागपुरात मते मागण्यासाठी नितीन गडकरींकडून प्रभू रामाचा गैरवापर; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

Complaint against Gadkari : नागपुरात मते मागण्यासाठी नितीन गडकरींकडून प्रभू रामाचा गैरवापर; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Apr 16, 2024 06:14 PM IST

Complaint against Gadkari - भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी हे मते मागण्यासाठी प्रभू रामाचा वापर करत असल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Complaint filed against BJP candidate Nitin Gadkari
Complaint filed against BJP candidate Nitin Gadkari

भारतीय जनता पक्षाचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान प्रभू रामाचा गैरवापर केला असून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ही मागणी केली आहे. भारतीय जनता पार्टी सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले असल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात लोंढे यांनी राज्य निवडणुक आयोगाला पत्र लिहिले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

 ‘नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे आदर्श निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करावी तसेच भाजपवर योग्य दंड ठोठावण्याची त्वरित कारवाई करावी.’ अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

राहुल गांधींवर कारवाई; भाजपला सूट

भारतीय जनता पक्षाचे नेते सर्व नियम धुडकावत असताना निवडणूक आयोग मात्र सत्ताधारी भाजपावर कोणतीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. निवडणूक आयोगाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली. परंतु भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास निवडणूक आयोग मात्र घाबरते. यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणूक आयोग दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा सवालही लोंढे यांनी केला आहे. 

‘शिलाजीत’ वरून झाली होती गडकरींवर टीका 

नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भाजप उमेदवार सुधीर मुणगंटीवार यांच्या प्रचार सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. मुणगंटीवार यांनी 'शिलाजीत' देऊ असं वक्तव्य गडकरी यांनी केलं होतं. 

 

WhatsApp channel