केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी नागपुरात भव्य रोड शो केला. या रोड शोमध्ये , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. तर जाणून घेऊन त्यांच्याकडे किती चल-अचल अशी एकूण किती संपत्ती आहे.
नितीन गडकरी व त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्या नावावर सामूहिकरित्या १५.५२ कोटींची संपत्ती आहे. २०१९ च्या तुलनेत ही तब्बल ५१ टक्क्यांनी अधिक आहे. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे एकूण २.५७ कोटींची चल संपत्ती आहे. यामध्ये २७.०५० रोकड, ६५.१० लाख बँकेत जमा, ३८.५० लाखांची गुंतवणूक, ४५.९४ लाखांचे वाहन तर ५६ लाखांचे दागदागिने आहेत.
त्याचप्रमाणे गडकरी यांच्याकडे सामूहिकरित्या १२.९४ कोटींची अचल संपत्ती आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील धापेवाडामधील १५७ कोटी रुपये किंमतीची १५ एकर जमीन, मुंबईतील वरळी येथे ४.९५ कोटी रुपयांचा एक प्लॉट आणि १.२८ कोटी रुपये किंमतीचे धापेवाडामधील वडिलोपार्जित घराचा समावेश आहे. त्याचबरोबर नागपूरमधील उपाध्याय रस्त्यावर ५.१४ कोटी रुपयांचे घर आहे.
नितीन गडकरींकडे १.३२ कोटी रुपयांची चल संपत्ती व ४.९५ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात गडकरी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एका अच व अचल संपत्ती १०.२७ कोटी रुपयांची होती.