IPL Playoffs Tickets : प्लेऑफ सामन्यांचं सर्वात स्वस्त तिकिटं किती रुपयांना? ते कसं खरेदी करणार? जाणून घ्या-ipl playoffs 2024 tickets sale live today heres how to book ipl match tickets online ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Playoffs Tickets : प्लेऑफ सामन्यांचं सर्वात स्वस्त तिकिटं किती रुपयांना? ते कसं खरेदी करणार? जाणून घ्या

IPL Playoffs Tickets : प्लेऑफ सामन्यांचं सर्वात स्वस्त तिकिटं किती रुपयांना? ते कसं खरेदी करणार? जाणून घ्या

May 14, 2024 10:21 PM IST

IPL Playoffs 2024 Tickets : आयपीएल २०२४ च्या प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू झाली आहे. चाहते ते ऑनलाइन खरेदी करू शकतात. चाहते पेटीएम इनसाइडरवरून तिकिटे खरेदी करू शकतात.

IPL Playoffs Tickets : प्लेऑफ सामन्यांचं सर्वात स्वस्त तिकिटं किती रुपयांना? ते कसं खरेदी करणार? जाणून घ्या
IPL Playoffs Tickets : प्लेऑफ सामन्यांचं सर्वात स्वस्त तिकिटं किती रुपयांना? ते कसं खरेदी करणार? जाणून घ्या (PTI)

आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफचे सामने २१ मे पासून सुरू होणार आहेत. या सामन्यांची तिकीट विक्री सुरू झाली आहे. प्लेऑफ सामन्यांचे सर्वात स्वस्त तिकीट ४९९ रुपयांचे आहे. तर सर्वात महाग तिकिटासाठी तुम्हाला १० हजार रूपये मोजावे लागतील. 

अहमदाबादमध्ये प्लेऑफचे दोन सामने होणार आहेत. तर अंतिम सामना चेन्नईत होणार आहे. चाहते ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकतात.

आयपीएल २०२४ चा पहिला क्वालिफायर २१ मे रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाईल. या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट ४९९ रुपयांचे आहे. सर्वात महाग तिकीट १० हजार रुपयांचे आहे.  १० हजार रुपयांचे तिकीट असलेले प्रेक्षक प्रीमियम सूटमध्ये बसतील. ते पाचव्या मजल्यावर आहे.

एलिमिनेटर सामना अहमदाबादमध्येच होणार 

पहिल्या क्वालिफायरनंतर एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. हा सामना २२ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. एलिमिनेटर सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट ४९९ रुपयांचे आहे. या सामन्याचे सर्वात महाग तिकीट ६००० रुपयांचे आहे. ज्या प्रेक्षकांनी सर्वात महाग तिकिटे खरेदी केली आहेत ते प्रेसिडेंट गॅलरीत बसतील.

दुसऱ्या क्वालिफायरचे तिकीट दोन रुपयांपासून सुरू 

IPL २०२४ चा दुसरा क्वालिफायर २४ मे रोजी खेळवला जाईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट २००० रुपयांचे आहे. सर्वात महाग तिकीट ५ हजार रुपयांचे आहे. या सामन्याची तिकिटे ४ प्रकारात आहेत. सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग तिकिटं २५०० आणि ३००० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

तिकीट कसे खरेदी करावे 

आयपीएलने तिकीट विक्रीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. IPL ने X वर एक पोस्ट शेअर केली, यामध्ये तिकिट खरेदीची प्रोसेस सांगण्यात आली आहे. पेटीएम इनसाइडरवरून तुम्ही तिकिट खरेदी करू शकता. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.