मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Ambedkar : देशावर कर्जाचा डोंगर उभा करतील, संन्यास घेतील अन् निघून जातील, प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर घणाघात

Prakash Ambedkar : देशावर कर्जाचा डोंगर उभा करतील, संन्यास घेतील अन् निघून जातील, प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर घणाघात

Mar 08, 2024, 11:45 PM IST

  • Prakash Ambedkar On Modi : देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर घणाघात

Prakash Ambedkar On Modi : देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

  • Prakash Ambedkar On Modi : देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. १५ जागांवर मतभेद असून ते मिटल्यावरच वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत असणार की नाही ते ठरेल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. इचलकंरजीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर पुन्हा टीकास्त्र डागले. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Womens Abuses Police: मुंबईत मद्यधुंद तीन तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

Weather Updates: विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आज अवकाळी पावसाची शक्यता, मुंबई आणि कोकणात उष्णता कायम

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आताचे सरकार हे डाकूंचे सरकार आहे. आधी देवशावर १०० पैकी २४ रुपयांचे असणारे कर्ज या सरकारने ८४  रुपयांवर नेले.  गेल्या १० वर्षात हे कर्ज २४ वरून ८४ रुपयांवर नेले आहे. जागतिक बँकेने भारताला इशारा दिला असून जर एखाद्याला १० हजार पगार असला आणि १० हजाराचाच बँकेचा हफ्ता असेल तर तुमची चूल कशी पेटणार. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुन्हा जर या सरकारला संधी दिली तर दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे. आज ८४ रुपये असलेले कर्ज २०२६ मध्ये १०० रुपयांचे होईल. देशावर कर्जाचा डोंगर उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय. 

मोदींच्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंग सरकारच्या काळात १३५ विमाने फ्रांसकडून विकत घ्यायची होती. सनातन वाल्यांनो सांगा तुम्ही किती विमाने आणली. देशात केवळ ३५ विमान आली, उरलेली १०० कधी येणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

जागावाटपाबाबत विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बहुजन आघाडीच्या वाट्याला किती जागा मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होतोय. पण १५ जागांबाबत महाविकास आघाडीत मतभेद असल्याने आम्हाला या भिजत घोंगड्याच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आमच्या बाजूने निर्णय न झाल्यास सर्व ४८ जागा स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. या निवडणुकीत एमआयएमबरोबर वंचित आघाडी जाणार नाही आणि या निवडणुकीत वंचित-भाजप अशीच खरी लढत होईल, असे त्यांनी सांगितले.