मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

May 09, 2024, 07:57 AM IST

  • Mumbai airport closed for 6 hours on Today: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या ९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास बंद राहतील.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. (ANI)

Mumbai airport closed for 6 hours on Today: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या ९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास बंद राहतील.

  • Mumbai airport closed for 6 hours on Today: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या ९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास बंद राहतील.

Mumbai airport runways News: मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या आज (९ मे २०२४) सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही धावपट्ट्या सकाळी ११.०० वाजल्यापासून ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत बंद राहतील, असे विमानतळ ऑपरेटर एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या विमानतळावरून दररोज सुमारे ९५० विमानांची वर्दळ असते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

“मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) पावसाळी आपत्कालीन योजनेचा एक भाग म्हणून प्राथमिक धावपट्टी ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ ९ मे २०२४ रोजी तात्पुरती कार्यान्वित राहणार नाही”, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

chicken shawarma news : धक्कादायक! मुंबईत रस्त्यावरील निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू; दोघांना अटक

दररोज सुमारे ९५० विमानांची वर्दळ

एअरलाइन्स आणि इतर भागधारकांना उड्डाणांचे वेळापत्रक आगाऊ ठरवण्याची सूचना करण्यासाठी डिसेंबरमध्ये नोटीस टू एअरमेन जारी करण्यात आली होती . धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे कोणत्याही विमान वाहतुकीवर परिणाम होणार नाही किंवा प्रवाशांची गैरसोय होणार नाही. प्राथमिक धावपट्टी, ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ या दोन क्रॉस रनवे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहतील. या विमानतळावरून दररोज सुमारे ९५० विमानांची वर्दळ असते.

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने काय म्हटले?

सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी याआधीही पावसाळी आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून मुंबई विमानतळाची धावपट्टी एक दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता विमानतळाच्या १४/३२ आणि ०९/२७ या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील." धावपट्टी बंद करणे ही वार्षिक प्रथा आहे आणि ऑपरेशनल सातत्य राखण्यास मदत करण्यासाठी आपत्कालीन योजनेचे उद्दीष्ट आहे.

मुंबई विमानतळ जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक

मुंबई विमानतळ जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरून एका तासाला सुमारे ४६ विमानांचे लँडींग आणि उड्डाण होते. तर, दुय्यम धावपट्टीवरून तासाला अंदाजे ३५ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या