Palghar Crime News : पालघर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीं दोन वेळा पीडितेवर अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पिडीत मुलीशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करून तिला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पालघर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना सोमवारी तलासरी येथे सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या तक्रारदार मुलीची आरोपींशी सोशल मीडियावरून मैत्री झाली होती. यानंतर आरोपीने मुलीशी जवळीक वाढवून तिचा विश्वास संपादन करून तिला घरी बोलावले. यानंतर तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. पीडित मुलीचे वय १५ तर दोन्ही आरोपींचे वय सुमारे २० वर्ष आहे.
आरोपीने पीडितेशी इंस्टाग्रामवर मैत्री केली. दोघांमध्ये मैत्री वाढली. ३० एप्रिल रोजी तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. दोघेही एका ठिकाणी भेटल्यावर त्याने तिला त्याच्या घरी नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा ४ मे रोजी आरोपीने त्याच्या आणखी एका मित्राला सोवत घेऊन पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला. अत्याचार झाल्यानंतर मुलगी घरी पोहोचली, तिची अवस्था पाहून मुलीचे कुटुंबीय हादरले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. यानंतर तिच्यावर बेतलेला प्रसंग तिने सांगितला. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दिली.
पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी त्यांची नावे बदलली. यानंतर दोघेही फरार झाले होते. मात्र, त्यांच्या फोनच्या लोकेशन वरून पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असतांना दोन्ही आरोपींना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुढील तपास पालघर पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या