मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 08, 2024 11:20 AM IST

matrimonial site scammer : मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक करणाऱ्या आणि ७ मुलींशी लग्न करून त्यांच्या कडून लाखो रुपये लुबाडणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींशी विवाह करुन लाखोंची गंडवणाऱ्या आरोपीला अटक
मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींशी विवाह करुन लाखोंची गंडवणाऱ्या आरोपीला अटक

Mumbai Police arrested matrimonial site scammer : मेट्रिमोनियल साईटवरून मुलींशी ओळख करून त्यांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या आरोपीने तब्बल २२ मुलींची आर्थिक फसवणूक तर ७ मुलींची लग्न करून त्यांना लाखो रुपयांनी गंडवल्याचे उघड झाले आहे. त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची देखील माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Covishield च्या साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय! बाजारातून लस मागवली परत

इम्रानअली खान असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. त्याने सोलापूर, मुंबई, परभणी, धुळे, कोलकाता, लखनऊ येथील अनेक तरुणींशी मेट्रिमोनियल साईटवरून ओळख करत त्यांना फसवले आहे. त्याने सात तरुणींशी लग्न केले असून त्यांना लाखो रुपयांनी फसवले आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानुसार या आरोपीच्या शोधात पोलिस होते. मुंबई पोलिसांनी आरोपीला हैदराबादमध्ये जाऊन अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे.

IPL मॅच सुरू असताना दिल्लीतील स्टेडियममध्ये केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा; व्हिडिओ व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ४२ वर्षीय महिलेने २०२३ मध्ये मेट्रिमोनियल साईटवर तिची माहिती दिली होती. याच साईटवरून काही मुलांची नावे वेगळी करून या महिलेला त्यांची माहिती देण्यात आली होती. यावेळी हैदराबाद येथील इम्रानअली खान याचेही या यादीत नव होते. या महिलेने आरोपी इम्रानशी संपर्क साधला. यावेळी इम्रानने तो बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याची बतावणी केली. दरम्यान, इम्रानने तक्रारदार महिलेला त्याच्या जाळ्यात फसवले व लग्न करण्याचे आमिष दाखवले.

Viral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

दरम्यान, इम्रानने १० मे २०२३ रोजी तिला फोन करत मित्रांना दोघांबाबत सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना आता तुझ्याकडून पार्टी हवी आहे. असं सांगून इम्रानने तक्रारदर महिलेकडून एक हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतले. काही दिवसांनी तक्रारदार महिलेने इम्रानला आईला भेटण्यासाठी मुंबईत येण्यास सांगितले. मात्र, त्याने त्याचे पैसे काही ठिकाणी अडकले असल्याची बतावणी करून मुंबईत येण्यासाठी १० हजार रुपये देण्याची मागणी केली. तक्रारदार महिलेने त्याला पैसे दिले. मुंबईत आल्यावर काही दिवसांनी आरोपीने महिलेकडून भायखळा येथे एक भूखंड खरेदी करण्याचे कारण देत १५ लाख रुपये घेतले.

यानंतर त्यानंतर वन विभागाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे कारण देत जामिन घेण्यासाठी व इतर गोष्टींसाठी आरोपीने आणखी पैसे महिलेकडून उकळले. तब्बल २१ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक त्याने तक्रारदार महिलेची केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याला हैद्राबाद येथून अटक केली. यावेळीत्याची चौकशी केली, त्याने मुंबईतील १० ते १२ मुलींसह सोलापुर, धुळे, परभणी, येथील महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

सात मुलींशी केले लग्न; २२ तरुणींची केली फसवणूक

चौकशीत आरोपीने ७ तरुणींशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. आरोपीने कोलकाता, लखनऊ, दिल्ली व देहरादून येथील महिलांना देखील फसवले आहे. आरोपीच्या मोबाईल तपासला असता तो अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग