मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  व्हॉट्सॲप हॅक करून पाठवले अश्लिल व्हिडिओ, ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात एकाला अटक

व्हॉट्सॲप हॅक करून पाठवले अश्लिल व्हिडिओ, ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात एकाला अटक

Jul 23, 2022, 03:24 PM IST

    • Mumbai Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थीनीचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यावरून मित्रांना अश्लिल व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
WhatsApp Hacking Case In Mumbai (HT)

Mumbai Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थीनीचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यावरून मित्रांना अश्लिल व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

    • Mumbai Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थीनीचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यावरून मित्रांना अश्लिल व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

WhatsApp Hacking Case In Mumbai : मुंबईतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण विद्यार्थीनीचं व्हॉट्सॲप हॅक करून तिच्या मैत्रिणींना अश्लिल व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी खासगी बँकेत काम करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळं सायन परिसरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करण्याऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बँक कर्मचाऱ्यानं बॅंकेच्या खातेदारांच्या यादीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मोबाईल नंबर मिळवला होता. त्यात आरोपीनं पिडित विद्यार्थीनीला फोन करून स्वत:ला विद्यार्थी असल्याचं सांगत नोट्स आणि इतर अभ्यासासाठी लागणाऱ्या सामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पिडित मुलीनं यासाठी सहमती देताच तिला आरोपीनं मुलीला एक लिंक पाठवून मोबाईलमध्ये आलेल्या एक ओटिपीची माहिती घेतली.

त्यानंतर आरोपी बँक कर्मचाऱ्यानं पिडित मुलीच्या व्हॉट्सॲप अकाउंटचा ऍक्सेस घेऊन तिच्या किमान ३५ मैत्रिणींना अश्लिल व्हिडिओ पाठवले. या सर्व व्हिडिओंमध्ये तरुणीचे फोटो मार्क करून वापरण्यात आले होते. त्यामुळं या सर्व प्रकाराबद्दल पिडित मुलीनं आरोपीला जाब विचारला असता आरोपीनं मुलीला एकांतात भेटण्याची मागणी केली. घडत असलेल्या या सर्व प्रकाराविरोधात पिडित मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीच्या कॉल डिटेल्स मिळवून त्याला सायनमधून अटक केली आहे.

आरोपीनं केलेला गुन्हा कबूल केला असून परंतु ज्या लोकांना त्यानं व्हिडिओज पाठवले आहेत, त्यापैकी कुणालाही तो भेटला नसल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी बँक कर्मचाऱ्याविरोधात पोस्को आणि विविध आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय या गुन्ह्यात आणखी कुणाकुणाचा हात आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा