मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राजधानी हादरली, पार्टीसाठी बोलावून महिलेचा केला सामुहिक बलात्कार; चौघांना अटक

राजधानी हादरली, पार्टीसाठी बोलावून महिलेचा केला सामुहिक बलात्कार; चौघांना अटक

Jul 23, 2022, 11:09 AM IST

    • Delhi Crime News : पार्टी करण्यासाठी बोलावलेल्या महिलेवर चार रेल्वे कर्मचाऱ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली आहे. त्यामुळं आता दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Gangrape In New Delhi Railway Station (HT)

Delhi Crime News : पार्टी करण्यासाठी बोलावलेल्या महिलेवर चार रेल्वे कर्मचाऱ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली आहे. त्यामुळं आता दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे.

    • Delhi Crime News : पार्टी करण्यासाठी बोलावलेल्या महिलेवर चार रेल्वे कर्मचाऱ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली आहे. त्यामुळं आता दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Gangrape In New Delhi Railway Station : गेल्या काही दशकांमध्ये राजधानी दिल्ली देशाच्या राजधानीसह क्राईम कॅपिटलही होत चालली आहे. दिल्लीत दररोज क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता दिल्लीत पुन्हा एक सामुहिक बलात्काराचं प्रकरण उघडकीस आलं आहे. त्यामुळं राजधानीत खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी एका महिलेला पार्टीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी तिच्यासोबत कोणतीही पार्टी न करता तिला अज्ञातस्थळी नेऊन चौघांनी बलात्कार केला आहे. ही घटना घडल्यानंतर पिडित महिलेनं नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या ८ नंबर प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पोलिसांनी फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

पिडित महिला ही गेल्या एक वर्षांपासून पतीपासून वेगळं राहते, तिच्या घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे. गेल्या वर्षी पिडित महिला तिच्या मित्रामुळं एका तरुणाच्या संपर्कात आली होती. तो रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगत त्यानं पिडित महिलेला नोकरीचं आश्वासनंही दिलं होतं. बोलणं सुरू झाल्यानंतर रेल्वेत काम करणाऱ्या आरोपी तरुणानं पिडित महिलेला पार्टी करण्यासाठी बोलावलं, आणि रेल्वे स्टेशनजवळील झोपडीत नेऊन बलात्कार केला. यावेळी आरोपीशिवाय तिन लोकांनीही आळीपाळीनं रेप केल्याचं पिडितेनं सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराची घटना घडत असताना काही लोकांनी आरोपींना साथ दिली होती. त्यामुळं महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत चार आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तर त्यांना या घटनेत साथ देणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

विभाग

पुढील बातम्या