मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM शिंदेंचा ठाकरेंना ‘दे धक्का’; दोन प्रकरणांचा तपास CBI कडे सोपवला

CM शिंदेंचा ठाकरेंना ‘दे धक्का’; दोन प्रकरणांचा तपास CBI कडे सोपवला

Jul 23, 2022, 10:35 AM IST

    • CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अनेक विविध निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास सीबीआयकडं वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
CM Eknath Shinde Vs Uddhav Thackrey (PTI)

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अनेक विविध निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास सीबीआयकडं वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

    • CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अनेक विविध निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास सीबीआयकडं वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackrey : शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. मुंबई मेट्रो, आरे कारशेड आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थेट जनतेतून निवड, असे अनेक निर्णय त्यांनी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याच्या काही दिवसांतच घेतले आहे. याशिवाय त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेकही देण्यास सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रश्मी शुक्ला फोन टॅपिंग केस चांगलीच गाजली होती. त्याचा तपासही मुंबई पोलिसांनी केला होता. परंतु आता शिंदे सरकारनं या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाकडं वर्ग केला आहे. रश्मी शुक्लांच्या प्रकरणात मुंबई आणि पुण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय तात्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही जवाब नोंदवण्यात आला होता. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही या प्रकरणात पोलिसांनी विचारपूस केली होती. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं परंतु पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेलं नव्हतं. त्यामुळं राज्यातील या बहुचर्चित प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे.

याशिवाय जळगांव जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेला ताब्यात घेण्यासाठी संस्थेच्या संचालकाचं अपहरण करून पाच लाखांची खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाचाही तपास शिंदे सरकारनं सीबीआयकडं वर्ग केला आहे. त्यामुळं आता राज्यातील या दोन प्रकरणांचा तपास सीबीआय करणार आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला आहे. यात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत, मुंबईतील ड्रग्ज प्रकरण आणि अशा अनेक प्रकरणांच्या तपासानंतर आता रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आणि जळगावातील खंडणी प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्यात आला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या