मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Laptop Protest : केरळात गाजतंय 'लॅपटॉप आंदोलन'; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा!

Laptop Protest : केरळात गाजतंय 'लॅपटॉप आंदोलन'; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा!

Jul 23, 2022, 10:42 AM IST

    • Laptop Protest : केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या लॅपटॉप आंदोलनाची फार चर्चा होत आहे. काय आहे नेमकं हे प्रकरण आणि आंदोलन?, जाणून घ्या.
Laptop Protest In Kerala (HT)

Laptop Protest : केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या लॅपटॉप आंदोलनाची फार चर्चा होत आहे. काय आहे नेमकं हे प्रकरण आणि आंदोलन?, जाणून घ्या.

    • Laptop Protest : केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या लॅपटॉप आंदोलनाची फार चर्चा होत आहे. काय आहे नेमकं हे प्रकरण आणि आंदोलन?, जाणून घ्या.

Laptop Protest In Kerala : सध्या केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये लॅपटॉप आंदोलनाची फार चर्चा होत आहे. तरुणांनी एकमेकांच्या मांडीवर बसून फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं या आंदोलनाची देशभरात चर्चा होत आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला तरुणांनी 'लॅपटॉप आंदोलन' असं नाव दिलं आहे. परंतु नेमकं हे आंदोलन काय आहे, विद्यार्थी का एकमेकांना चिटकून फोटो काढतायंत?, जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

काय आहे लॅपटॉप आंदोलन?

मिळालेल्या माहितीनुसार, केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग त्रिवेंद्रम जवळ एक बस स्टॉप आहे. हे बसस्टॉप कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आवडतं हँगआउट स्पॉट्स आहे. त्यामुळं या स्थळावर तरुण आणि तरुणी नेहमी गर्दी करत असतात. परंतु या स्पॉटवर तरुण तरुणीच्या गोंधळामुळं आणि मजा मस्तीवर स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणाला स्थानिकांनी विरोध करत पोलिसांकडं तक्रार केली. परंतु पोलिसांनी या तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं संतापलेल्या स्थानिक लोकांनी बसस्टॉपवर असलेल्या बाकाचे तीन तुकडे करून टाकले.

...आणि सुरू झालं लॅपटॉप आंदोलन

बसस्टॉपवर तरुण आणि तरुणींना एकत्र बसता येऊ नये, म्हणून स्थानिकांनी बसस्टॉवरच्या बाकाचे तीन तुकडे केल्यानंतर ज्या बाकावर सहा ते सात जणं बसू शकत होते, तिथं केवळ दोन ते तीन लोकांनाच बसायला जागा उरली होती. त्यामुळं बसस्टॉपवरील बाक तोडल्यानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी 'लॅपटॉप आंदोलन' सुरू केलं. यावेळी मुलींनी मुलांच्या मांडीवर बसून मॉरल पोलिसिंगचा निषेध केला आहे. याशिवाय तरुणाईनं हे आंदोलन सुरू करून स्थानिक लोकांना आव्हानही दिलं आहे. त्याचबरोबर या आंदोलनातून आम्ही आमच्या पद्धतीनं जगण्यास मोकळे आहोत, असं सांगण्याचा प्रयत्न तरुणाईनं केला आहे.

आमचं आंदोलन हे स्थानिकांच्या विरोधात नसून लोकांच्या जेंडरकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाच्या विरोधात आहे, लोकांनी मुलगा असो की मुलगी, दोन्हींकडं निरपेक्ष नजरेनं पाहायला हवं, असं आंदोलक विद्यार्थिनी पी. एम. नंदना हिनं सांगितलं आहे. त्याचबरोबर कॉलेजबाहेरील बसस्टॉपवर उभारण्यात आलेले बाक हे गेल्या नऊ वर्षांपासून अनधिकृतपणे उभारण्यात आलेले आहेत, त्यामुळं स्थानिकांनी हा विषय सोडवावा, अशी भूमिका त्रिवेंद्रम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगनं घेतली आहे. तर देशभरात गाजत असलेल्या या आंदोलनाला एसएफआय आणि डीवायएफआयनं या विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर शहराच्या महापौरांनी या आंदोलकांची भेट घेत त्यांना लवकरच महापालिकेतर्फे नवीन बाक तयार करून देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

विभाग

पुढील बातम्या